
लखोबा लोखंडे! पोलिस फौजदार असल्याचे सांगून केली पाच लग्न अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका पोलिस फौजदार असल्याचे सांगून तब्बल पाच लग्न केली. पाचव्या पत्नीने त्याच्या विरोधात तक्रार दाखल असून, तो फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. बरेलीमध्ये नवाबगंज क्षेत्रात ही घटना घडली आहे.
पोलिस फौजदार असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीशी एका युवतीचं लग्न लावून देण्यात आले होते. त्याने त्या युवतीच्या वडिलांकडून अडीच लाख रुपयेही घेतले होते. लग्न झाल्यानंतर जेव्हा नवविवाहित युवती सासरी गेली, तेव्हा आपल्याशी केलेले हे लग्न पाचवं असल्याचे समजले. शिवाय, तो पोलिस फौजदारही नव्हता. हे समजल्यानंतर युवतीला धक्का बसला. तिने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पीडितेने सांगितले, ‘आरोपीने मला सांगितले होते की तो एक पोलिस फौजदार आहे. स्वतः फौजदार असल्यासारखा रुबाबही दाखवायचा. माझ्या घरच्यांना ते खरं वाटले. त्यामुळे त्यांनी माझं त्याच्याशी लग्न लावून दिले. हुंडा म्हणून अडीच लाख रुपयेही दिले. पण, लग्नानंतर खरी परिस्थिती समजल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच घसरली. मला न्याय हवा आहे.’
दरम्यान, पीडित युवतीच्या कुटुंबीयांनी नंतर शोध घेतला, तेव्हा असं कळलं, की त्याच्या आधीच्या चारही पत्नींनी कोर्टात खटला दाखल केला आहे. चारही पत्नी वेगवेगळ्या राहत आहेत. एक पत्नी गाझियाबाद जिल्ह्यात, तर दुसरी पत्नी क्योलडिया पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात राहते. तिसरी आणि चौथी पत्नी बीसलपूर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात राहते. सध्या पती फरार असून, त्याचा शोध घेतला जात आहे.
लखोबा लोखंडे! दोघींशी लग्न, तिसरीसोबत बोलणी, चौथ्यांदा बोहल्यावर चढणार, तेवढ्यात…
लखोबा लोखंडे! दोघींशी लग्न, तिसरीसोबत बोलणी, चौथ्यांदा बोहल्यावर चढणार, तेवढ्यात…
राजाबाबू! डॉक्टर तर कधी अधिकारी सांगून 6 महिलांशी केली लग्न अन्…
युवतीने केली 13 दिवसांमध्ये 3 लग्न अन् हनिमूनच्या वेळी…
अहमदनगर जिल्ह्यात सिमरनने 8 महिन्यांत केली 9 लग्न; अखेर डाव फसला…
डॉक्टर नवरा अनेक महिलांशी चॅटिंग करायचा अन् एके रात्री…
नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS…
IPS महिला अधिकाऱ्याची फसवणूक; लग्नानंतर खरी माहिती उघड…

