
बँकेची फसवणूक प्रकरणी अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी…
घाटंजी / यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची 10 कोटी रुपयाच्या वर फसवणूक केल्याप्रकरणी यवतमाळ सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक तथा बॅकेचे अवसायक नानासाहेब चव्हाण, अनुपमा जगताप, अतुल जगताप, सचिन जगताप व दुय्यम निबंधक राजेंद्र वरटकर विरुद्ध फिर्यादी तथा बॅकेचे माजी उपाध्यक्ष ॲड. मनिषा कुळकर्णी यांच्या लेखी तक्रारीवरुन अवधुतवाडी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 420, 120ब, 468, 471, 34 अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहे.
दरम्यान, आरोपी अद्यापही फरार असून अवधूतवाडी पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहे. तथापि, यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आज आरोपी दुय्यम निबंधक राजेंद्र वरटकर यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. त्यांची बाजू ॲड. अजय डाखोरे हे न्यायालयात मांडणार आहे. अवधुतवाडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित चौधरी हे पुढील तपास करीत आहे.
यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचे अवसायक, दुय्यम निबंधक व इतर आरोपींनी 10 कोटी रुपया पेक्षा अधिक रकमेचे थकीत कर्ज बुडविण्याच्या अप्रमाणित हेतूने कर्जासाठी तारण / गहाण स्थावर मालमत्तेचा कर्जमुक्त करण्याचा खोटा दस्त दुय्यम निबंधक यवतमाळ कार्यालयात संगणमताने नोंदवून थकीत कर्जदारांना कर्जमुक्त करुन बॅक, सभासद व ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे आरोपी विरुद्ध नोंदविण्यात आले आहे.
अवधुतवाडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित चौधरी हे पुढील करीत आहे.

