पत्नीचे अनैतिक संबंध अन् कुटुंबातील चौघांचे मृतदेह…

कोलकाता (पश्चिम बंगाल): उत्तर 24 परगणा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचे मृतदेह विकृत अवस्थेत त्यांच्या फ्लॅटमध्ये आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे.

कापड व्यावसायिक वृंदाबन कर्माकर (वय ५२), त्यांची पत्नी देबश्री कर्माकर (वय 40), त्यांची मुलगी देबलीना (वय १७) आणि मुलगा उत्साह (वय ८) अशी मृतांची नावे आहेत.

बराकपूर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत खरदह भागातील एमएस मुखर्जी रोडवरील एका बंद अपार्टमेंटमध्ये हे मृतदेह आढळले. वृंदाबन कर्माकर यांनी प्रथम कुटुंबीयांना विष दिले आणि नंतर स्वतः आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वृंदाबनचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत होता. इतर तीन मृतदेह फ्लॅटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सापडले होते.

पोलिसांनी सांगितले की, ‘घटनास्थळावरून एक सुसाईड नोट जप्त केली आहे. त्यात वृंदाबन कर्माकर यांनी पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा केला असून ते सहन होत नसल्यामुळे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे लिहीले आहे. अपार्टमेंटमधून दुर्गंधी आल्याने स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. फ्लॅटचा मुख्य प्रवेशद्वार दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे तो तोडावा लागला. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

दिर आणि वहिणीचे अनैतिक संबंध अन् जीव गेला चिमुकल्याचा…

पत्नीला शेतामध्ये प्रियकरासोबत पाहिल्यानंतर नवरा चिडला अन्…

नवऱ्याच्या अनैतिक संबंधावरून कार्यालयातच चपलेने धुलाई…

दिराचे वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् वहिनीचे आणखी…

माता न तू वैरिणी! अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा म्हणून चिमुकल्याचा खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!