
हृदयद्रावक! चिमुकलीला गळफास देऊन बापानी केली आत्महत्या…
लातूर : चिमुकलीला गळफास देऊन बापाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे. या घटनेमुळे मोतीनगर भागात खळबळ उडाली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
मार्केट यार्डाच्या दक्षिण गेटच्या समोर भुतडा कुटुंबीय राहते. यांचे याच परिसरात कोरे गार्डनसमोर इडली गृह आहे. अभय लखन भुतडा (वय 35) हा इडली गृहातून जवळच असलेल्या घरी आला होता. मुलीला इडली देतो व शाळेत नेऊन सोडतो असे सांगितले. घरी आल्यानंतर त्याने स्वतःच्या सहा वर्षे वयाच्या मुलीस अगोदर गळफास देऊन तिला ठार केले व स्वतः गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेच्या वेळी अभय भुतडा यांची पत्नी याच परिसरात असलेल्या माहेरी गेली होती. आर्थिक कारणावरून त्याने हा निर्णय घेतला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पोलिसानी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हृदयद्रावक! पिंपरी-चिंचवडमध्ये मुलीची हत्या करून बापाची आत्महत्या…
हृदयद्रावक! दोन वाहनांच्या मध्ये चेंगरूण ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू…
हृदयद्रावक! शाळेतील तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू; वडिलांचा आक्रोश…
हृदयद्रावक! आईसमोरच लेकराचा जागीच अपघाती मृत्यू तर…
हृदयद्रावक! दीड वर्षांची चिमुकली अन् सहा महिन्यांची गर्भवती…

