लग्नसमारंभावेळी गोळीबार; थेट नवरीच्या डोक्यात घुसली गोळी…

चंदीगड (पंजाब): फिरोझपूर जिल्ह्यातील खाई फेमे गावात सुरू असलेल्या लग्नसमारंभावेळी गोळीबाराची घटना घडली. नवरीच्या डोक्याला डोक्यात गोळी घुसली असून, ती गंभीर जखमी झाली आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. बलजिंदर कौर (वय २३, रा. हशम टूथ) असे जखमी वधूचे नाव आहे. तिचा गुरुप्रीत सिंगसोबत विवाह होणार होता.

विवाह समारंभावेळी गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बलजिंदरला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची अवस्था नाजूक आहे. डीएसपी सुखविंदर सिंग यांनी सांगितले की, ‘घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे.’ गोळीबाराच्या घटनेनंतर वधूच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला.

दरम्यान, गोळीबार करणाऱ्यांवर पोलिस कडक कारवाई केली जाणार आहे, असेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

विवाहसोहळ्यादरम्यान समजले की होणारी नवरी आणि नवरदेव…

हनिमूनच्या रात्रीच नवरी रडत-रडत पडली खोलीबाहेर…

नवरी लग्नानंतर एकच रात्र नवरदेवा सोबत राहायची अन् हळूच…

हनिमूनच्या रात्रीपासूनच नवरीला त्रास सुरू; अखेर नको ते घडलं…

नवरदेवाची मैत्रीण ऐनवेळी घरी पोहचल्याचे नवरीला समजले अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!