रवींद्र महाजनी यांचा शवविच्छेदन अहवाल हाती; शेजारी म्हणाले…

पुणे : अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृतदेह तळेगाव दाभाडे येथील घरात आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मुलगा गश्मीर महाजनीला कळल्यानंतर तो त्वरित पुण्याला आला आहे. रवींद्र महाजनी यांचा मृतदेह शवविच्छेदसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला होता. शवविच्छेदनाा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.

रवींद्र महाजनी यांच्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात त्यांच्या शररीरावर कोणत्याही तीष्ण खुणा नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. साधारण दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाजनी यांचा अंतिम शवविच्छेदनाचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. अंतिम अहवाल हाती आल्यानंतर महाजनी यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्त करण्यात येईल. यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान, रवींद्र महाजनी हे शुक्रवारी (ता. १४) तळेगाव दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास पोलिसांनी घराचा दरवाजा तोडल्यानंतर रवींद्र महाजनी यांचा मृतदेह घरात पडलेला दिसला. शेजारी राहणाऱ्यांना देखील अभिनेते असल्याचे माहिती असले तरी त्यांच्याबाबत जास्त माहिती नव्हती. दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारच्यांची पोलिसांना कळवले होते.

अभिनेते महाजनी हे गेल्या आठ महिन्यांपासून तळेगाव दाभाडे येथे एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी महाजनी यांचा हॉलमध्ये मृतदेह आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. रवींद्र महाजनी हे जास्त कोणाशी बोलत नव्हते, अशी माहिती त्यांच्या शेजाऱ्यांनी दिली आहे.

‘मी मंगळवारी त्यांना शेवटचे पाहिले होते. कचरा देताना ते माझ्यासोबत बोलायचे. रुमच्या बाहेर वास येत असल्याने माझ्या सरांकडे लोकांनी तक्रार केली. त्यानंतर मी रुमजवळ जाऊन दरवाजा वाजवून आवाज दिला. मी सरांनी कोणीच आतून आवाज देत नसल्याचे सांगितले. मंगळवारी त्यांनी माझ्या हातात कचरा दिला होता. गुरुवारी ते झोपले आहेत असे वाटल्याने मी दरवाजा वाजवला नाही. शुक्रवारी मी दरवाजा वाजवत होते तरी त्यांनी दरवाजा उघडला नाही,” असे इमारतीमध्ये साफसफाई करणाऱ्या महिलेने सांगितले.

‘आम्हाला ते अभिनेते आहेत हे माहिती होते पण आम्हाला कालच समजलं की ते कोण आहेत. आम्ही मंगळवारीच गावावरुन आलो होतो. त्यानंतर शुक्रवारी घरातून दुर्गंधी येऊ लागली. ते कोणासोबतही बोलत नव्हते. त्यांच्यासोबत कोणीच राहत नव्हते. तसेच त्यांच्या कुटुंबातील कोणीच येत नव्हते. नेहमीच ते एकटे दिसायचे. आठ नऊ महिन्यांपासून ते इथे राहत होते,’ असे शेजारच्या महिलेने सांगितले.

“शुक्रवारी सकाळपासून वास येत होता. पण त्याकडे आम्ही दुर्लक्ष केले. दुपारी 12 वाजल्यापासून दुर्गंध वाढला. याची माहिती मी सुरक्षा रक्षकांना दिली. त्यांनी पोलिसांनी सांगितल्या पोलीस आले आणि त्यांनी दरवाजा उघडला. हॉलमध्ये रवींद्र महाजनी हे पडलेले होते. ते अभिनेते आहेत याची कल्पना होती. पण वयानुसार ते ओळखू येत नव्हते. ते स्वतः गाडी चालवत यायचे जायचे. त्यांच्यासोबत आम्हाला कधीच कोणी दिसले नाही. हाक मारल्यावर फक्त ते नमस्कार म्हणायचे. दुसरे काही बोलणे व्हायचे नाही. त्यांच्या पायाला काहीतरी झाले असल्याने ते थोडे लंगडत चालत होते,” असे एका शेजाऱ्याने सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!