Video: पोलिसांनी सोन्याची पॉलिश असलेली ‘गोल्डमन’च्या मोटारीवर केली कारवाई अन्…

पुणे : पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालक आणि काळ्या काचा असलेल्या वाहनधारकांविरोधात कारवाई केली. यावेळी 406 वाहनांवर कारवाई करत 4 लाख 37 हजारांचा दंड आकारण्यात आला. पोलिसांनी गोल्डमन म्हणून ओळख असलेल्या शहरातील एका वाहनचालकाच्या वाहनावरही कारवाई करत दंड आकारल्यामुळे परिसरात चर्चा रंगली आहे.

वाकड येथील फिनिक्स मॉल परिसर आणि थेरगाव येथील पदमजी पेपर मिल परिसरात ही कारवाई केली आहे. गोल्डमन गाईज अशा नावाने एक महागडी आलिशान गाडी शहरात फिरत असते. या वाहनचालकावरही पोलिसांनी कारवाई केली आहे. गोल्डमनने आपल्या चारचाकीला चक्क सोन्याचे पॉलिश केले आहे. या वाहनधारकाची गोल्डमन अशीच ओळख आहे. या गोल्डन गाडीमध्ये अनेकदा हाय प्रोफाईल व्यक्ती तसेच सेलिब्रिटी दिसतात. ही गाडी पाहण्यासाठी शहरात नागरिक गर्दी करतात. या वाहनावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ही कारवाई करताच त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून पोलिसांच्या या कारवाईची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. याशिवाय वाहतूक पोलिसांनी इतरही अनेक वाहनांवर कारवाई केली आहे. वाहतूक नियमांचं पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आहावन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी केले आहे.

पुणे शहरात वाहतूकीत प्रायोगिक तत्वावर बदल; जाणून घ्या,पर्यायी मार्ग कोणते…

वाहतूकीला शिस्त! पोलिसांनी गाडी उचलल्यास किती होणार दंड…

पुणे शहरात जड वाहनांना नो एन्ट्री! पाहा बदल…

शेअर मार्केट! पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चौघांना केली अटक; धागेदोरे बँकॉक पर्यंत…

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीकडून पकडल्या ११ मोटारी; पाहा क्रमांक…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!