
गँगस्टर शरद मोहोळ याच्या पत्नीचा जीवाला धोका असल्याचा दावा; कोणापासून पाहा…
पुणे : गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी गुंड गणेश मारणे याला पुणे पोलिसांनी पाठलाग करत अटक केली आहे. दुसरीकडे, शरद मोहोळ याची पत्नी स्वाती हिने पोलिस जबाबात गणेश मारणे याच्यापासून जिवाला धोका असल्याचा दावा केला आहे. गुरुवारी पोलिसांनी गणेश मारणे याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला नऊ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
गँगस्टर शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ आणि फिर्यादी अरुण धृपद धुमाळ यांनी गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्यापासून जिवाला धोका असल्याचे पुरवणी जबाबात सांगितले आहे. तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी गुरुवारी न्यायालयात याबाबतची माहिती दिली. पुणे पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात गोपनीय अहवाल सादर केला. गणेश मारणे याला पुणे पोलिसांनी पाठलाग करत नाशिक रोडवरुन बुधवारी पात्री बेड्या ठोकल्या. शरद मोहोळ खून प्रकरणात गणेश मारणे याच्यासह 15 आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई केली. त्यामुळे गुरुवारी मोक्का न्यायाधीश व्ही आर कचरे यांच्यापुढे सुनावणी झाली. तपास अधिकारी सुनील तांबे यांनी यावेळी सांगितले की, आतापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हे दोघे या खूनप्रकरणातील प्रमुख सूत्रधार आहेत. 5 जानेवारी रोजी शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याकाळात गणेश मारणे तीन राज्यात फिरल्याचे तपासात उघड झाले आहे न्यायालयाने गणेश मारणे याला 9 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, शरद मोहोळ खून प्रकरणात गणेश मारणे याचे नाव आहे. यापूर्वी त्याच्यावर आठ गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. त्यामुळे आरोपी गणेश मारणेला जास्तीत जास्त पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केला. याला गणेश मारणे याचे वकील राहुल देशमुख यांनी विरोध केला. आरोपी गणेश मारणे याच्यावर 2008 नंतर एकही गुन्हा नोंदवला नाही. पोलिसांकडून आम्ही गणेश मारणेची पोरं आहोत, असे आरोपीने सीसीटीव्हीमध्ये म्हटल्याचे दिसत आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण आरोपी साधे पुटपुटतही नसल्याचे दिसतेय. आरोपीला या कटात गोवण्यात आले आहे. दोन दिवसांची पोलिस कोठडी ठीक आहे, असा युक्तीवाद देशमुख यांनी केला.
थरार! शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले…
Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड…
शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी ‘वाघ्या’ला अटक…
शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी नवी माहिती समोर…
गँगस्टर शरद मोहोळ याचा CCTVसमोरच का केला खून…
मुळशी पॅटर्न! गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येमागची INSIDE STORY…
शरद मोहोळची पत्नी कडाडली; नवरा वाघ होता तर मी वाघीण आहे…
कुख्यात गुंड शरद मोहोळ प्रकरण! पोलिसांनी आवळल्या आठही जणांच्या मुसक्या…
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशी हल्ल्यात मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

