तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष मोरे यांनी हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून केली आत्महत्या…

पुणे: संत तुकाराम महाराजांचे वंशज, शिरीष महाराज मोरे (वय 30) यांनी आज (बुधवार) सकाळी राहत्या घरामध्ये गळफास घेत त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात आणि वारकरी सांप्रदायात एकच खळबळ उडाली आहे. देहू परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकीक होता. त्यांचा नुकताच त्यांचा विवाह ठरला होता. शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकीक होता. त्यांच्या मागे आई आणि वडील असा परिवार आहे.

देहूतील त्यांच्या राहत्या घरी शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज होते. काल रात्री जेवण केल्यानंतर ते झोपायला गेले, मात्र सकाळी खोलीचे दार उघडले नाही. त्यामुळे दार तोडले असता त्यांनी उपरण्याच्या साह्याने गळफास घेतल्याचे समोर आले आहे. आर्थिक विवंचनेतुन हे पाऊल उचलल्याचे सुसाईड नोट मध्ये नमूद करण्यात आले आहे. वीस दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता, तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. ते प्रवचन आणि कीर्तन करायचे.

शिरीष महाराज मोरे यांच्या चार हृदयद्रावक सुसाईड नोट आल्या समोर…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांचा नुकताच साखरपुडा झाला होता, तर 20 फेब्रुवारीला त्यांचा विवाह होणार होता. मात्र, त्याआधीच ही घटना घडली आहे. शिरीष महाराज मोरे यांनी नुकतेच नवीन घर बांधलेले होते. खालच्या मजल्यावर आई-वडील आणि वरच्या मजल्यावर ते राहतात. मंगळवारी रात्री मोरे वरील खोलीत झोपण्यासाठी गेले. सकाळी साडे आठ वाजल्यानंतरही ते खाली आले नाहीत. म्हणून घरातील लोकांनी वरती रूमजवळ जाऊन दरवाजा वाजवला पण दार उघडले नाही. आतून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे दार तोडलं. मात्र, मोरे यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. प्राथमिक माहितीनुसार आर्थिक विवंचेनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे कळत आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

दरम्यान, हभप शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिरीष महाराज यांनी आपलं जीवन संपवण्यापुर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामध्ये त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते.

पुणे शहरातील डॉक्टर युवतीची आत्महत्या; मोठी फसवणूक…

पोलिसकाकाने कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या…

धक्कादायक! मुलाच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच आई-वडिलांची आत्महत्या…

भाजपच्या महिला नेत्याची आत्महत्या; तपासात धक्कादायक माहिती समोर…

पोलिस अधिकाऱ्याच्या एकुलत्या एका मुलाची आत्महत्या; मी जीवनाचा आनंद घेतला आहे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!