नदी पात्रात अज्ञात व्यक्तीचा आढळला मृतदेह आढळला; पाहा वर्णन अन् संपर्क…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी): पारवा पोलिस स्टेशन अंतर्गत वघारा टाकळी वाघाडी नदीच्या पात्रात एका अज्ञात पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.

मौजा वघारा (टाकळी) शिवारातील व्यंकटेश मुद्देलवार यांच्या शेताजवळील नदीवरील बंधाऱ्याजवळ हे प्रेत वाहून आले असून ते झुडपात अडकलेले आढळले. ही घटना दि. ७ जुलै २०२५ रोजी दुपारी अंदाजे ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. माहिती मिळताच पारवा पोलिस स्टेशनचे पथक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन (यवतमाळ) आणि स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह वाघाडी पात्रातून नदीबाहेर काढला. या प्रकरणी राजापेठ येथील पोलिस पाटील सौ. उज्ज्वला सुदर्शन सवाईवार (वय 39 वर्षे) यांनी पारवा पोलिस स्टेशनला खबर दिली.

पारवा पोलिस ठाण्यात मर्ग क्र. २८/२०२५ नोंद करण्यात आला असून भादंवि कलम १९४ अंतर्गत गुन्हा दाखल करून पारवा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मृत व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे…
वय – अंदाजे ३५ वर्षे
अंगावर – पिवळ्या रंगाची टी – शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट शरीरयष्टी – मध्यम बांधा सदर मृतदेह ग्रामीण रुग्णालय, घाटंजी येथे शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला असून, याबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तत्काळ पुढील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पारवा पोलिसांतर्फे करण्यात आले आहे: तरी आपल्या परिसरातील हरवलेल्या व्यक्तीबाबतची माहिती पोलिसांना देऊन मृतदेहाची ओळख पटवण्यास मदत करा, असे आवाहन पारवा पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप नरसाळे यांनी केले आहे.

संपर्क क्रमांक:
ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप नरसाळे (API) – ८७७९६२९७६६
पो. हे. कॉ. सुरेश येलपुलवार – ९८२२८५३९८५

सातारा! विवाहितेच्या मृत्यूमागचं गुढ उकललं; प्रेमविवाह अन् पुन्हा प्रेम…

आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारमुळे एकाचा जागीच मृत्यू; आता स्पष्टीकरण…

जुगाराच्या नादात झालेले कर्ज फेडण्यासाठी पोलिस अधिकारीच बनला चोर…

सांगलीचे सुपुत्र लेफ्टनंट अथर्व कुंभार यांना प्रशिक्षणादरम्यान वीरमरण…

महाराष्ट्र पोलिस दलात खांदेपालट; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!