पुणे जिल्ह्यात शिक्षकाने शाळेत केला अल्वपयीन मुलीचा विनयभंग; पाहा कारनामे…

पुणे: पुणे जिल्ह्यातील पौड मुळशी तालुक्यातील आंदगाव येथील एका शाळेमध्ये 19 अल्ववयीन विद्यार्थीनींचा शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. विनयभंग केल्याप्रकरणी शाळेतील उपशिक्षक जालिंदर नामदेव कांबळे (रा. लोणी काळभोर) याला पौड पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षक दिनाच्या दिवशी हा प्रकार समोर आल्याने नागरिकांनी आणि पालकांनी संताप व्यक्त केला आहे. शाळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र चंद्रकांत मारणे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली होती.

आंदगाव येथील शाळेत उपशिक्षक जालिंदर नामदेव कांबळे हा विद्यार्थिनींना मारहाण करतो, त्यांच्याशी अश्लील भाषेमध्ये बोलतो. शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाला मिळाली होती. 5 सप्टेंबरला संस्थेच्या कार्यकारिणी समितीमधील सदस्य शाळेत चौकशीसाठी गेले. त्या वेळी शाळेतील 19 विद्यार्थिनींनी सदस्यांना जालिंदर नामदेव कांबळेच्या वर्तणुकीविषयी लेखी अर्ज दिले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

शाळेकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, कांबळेने शाळेत खेळणाऱ्या मुलीच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिला मिठी मारली, त्या वेळी इतर विद्यार्थी ओरडल्याने त्याने तिला सोडले. कांबळे हा वर्गामध्ये विनाकारण विद्यार्थिनींच्या अत्यंत जवळ जाऊन कानामध्ये बोलायचा किंवा मग मोठ्याने कानात ओरडायचा. हाताला स्पर्श करून डोक्यावर डोके आपटत होता, त्याला विरोध केल्यानंतर तो मुलींना मारहाण देखील करायचा. त्याचबरोबर शिक्षक कांबळे हा शिकवताना विनाकारण फळ्यावर मुका, किस, पप्पी असे शब्द मुद्दाम लिहायचा. शिकवताना मामाने मामीला मळ्यात मिठी मारली, असे देखील म्हणायचा. शाळेतील विद्यार्थिनींनी याबाबत तक्रारी केल्या आहेत.

दरम्यान, जालिंदर कांबळेला पौड पोलिसांनी लोणी काळभोरमधून अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव हे करीत आहेत.

पुणे! पॉक्सो गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या शिक्षकाने पुन्हा केलं नको ते कृत्य…

सेवानिवृत्त शिक्षकाने अनैतिक संबधाच्या संशयावरून पत्नीचे केले ५७ तुकडे…

पवित्र नात्याला काळिमा! शिक्षकाच्या फोनमध्ये सापडले 45 अश्लील व्हिडीओ…

पुणे शहरात शिक्षकाकडून विद्यार्थीनीला ‘I Love You’ चा मेसेज अन्…

शिक्षकाने बॅड टच करत तुला पीटी क्लास कसा वाटला? असे विचारले अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!