
पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या…
पुणे: पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पोलिस कर्मचारी विजय कोळी हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस दलात कार्यरत असणारे विजय कोळी कौटुंबिक कलहातून दोन दिवसांपूर्वी घरातून निघून गेले होते. विजय हे जाताना सरकारी पिस्तुल घेऊन गेल्याने संपूर्ण पोलिस दल त्यांचा शोध घेत होते. कोळी निगडी दुर्गा देवी टेकडी परिसरात शेवटचे दिसल्याने त्यांचा ड्रोनच्या साहाय्याने देखील शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आज (शनिवार) सकाळी निगडी ट्रान्सपोर्ट नगर येथील बस डेपोमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.
View this post on Instagram
सरकारी पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून कोळी यांनी आत्महत्या केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कोळी RTPC म्हणून नियुक्तीला होते. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता २३) सकाळी साडेअकराच्या सुमारास कोळी घरातून निघून गेले. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. जाताना त्यांच्याकडे सरकारी पिस्तूल असल्याचे समोर आल्यानंतर पोलिस यंत्रणेने त्यांचा शोध सुरू केला होता. त्यांचे शेवटचे लोकेशन निगडीतील दुर्गादेवी टेकडी परिसरात आढळल्याने त्या भागात पोलिसांनी व्यापक शोधमोहीम राबवली. ड्रोनच्या साहाय्यानेही परिसर पिंजून काढण्यात आला होता.
दरम्यान, आज सकाळी निगडी ट्रान्सपोर्टनगर येथील बस डेपो परिसरात कोळी यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी सरकारी पिस्तूलही मिळून आले. प्राथमिक तपासात त्यांनी त्याच पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. चिखली पोलिस पुढील तपास करीत आहेत.
पुणे पोलिस दलातील हवालदाराचा बंदोबस्तादरम्यान हृदयविकाराने मृत्यू…
पोलिस आत्महत्या! प्रेमाचे दोन शब्द कधी तरी बोलली असती, तर..
पोलिस निरीक्षकाने आत्महत्या करणार असल्याचं पत्र लिहिलं पोलिस महासंचालकांना…
बीड! बडतर्फ पोलिस अधिकारी सुनील नागरगोजे यांची आत्महत्या…
पुणे वाहतूक शाखेतील पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या…

