
Video: खाकी वर्दीतला देव चिमुकलीच्या मदतीला धावला…
रत्नागिरी : एक चिमुकली आणि एक प्रौढ व्यक्ती बैलगाडीखाली आल्याने गंभीर जखमी झाली, त्यावेळी त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणारे खेड पोलिस ठाण्याचे हवालदार संपत गीते यांच्या माध्यमातून खाकी वर्दीतला देव त्या चिमुकलीच्या मदतीला धावल्यामुळे जीव वाचला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या हेदली (ता. खेड) गावात रविवारी (ता. २१) राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेदरम्यान बैलगाडा मालकाचे नियंत्रण सुटले आणि बैल उधळून थेट प्रेक्षकांमध्ये शिरला. यावेळी झालेल्या दुर्घटनेत स्पर्धा पाहण्यासाठी आलेली एक चिमुकली आणि एक प्रौढ व्यक्ती गंभीर जखमी झाली, त्यावेळी त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणारे खेड पोलिस ठाण्याचे हवालदार संपत गीते यांच्या माध्यमातून खाकी वर्दीतला देव त्या चिमुरडीच्या मदतीला पोहचला.
खाकी वर्दीतला देव चिमुकलीच्या मदतीला धावला…https://t.co/PnRMZv3iSC pic.twitter.com/2ZItIfmBPF
— policekaka News (@policekaka) January 22, 2024
खाकी वर्दीतल्या हवालदार संपत गीते यांनी धाडसाने मैदानात धाव घेत त्या चिमुकलीपर्यंत पोहचले. पोलिसकाकाने तिला खांद्यावर घेतले आणि धावत सुटले. मैदान मोठे असल्याने जवळपास काहीच साधन न्हवते. हवालदार गीते हे 250 ते 300 मीटर एवढे अंतर चिमुकलीला खांद्यावर घेऊन रस्त्याच्या दिशेने धावले. पुढे रुग्णवाहिकेतून चिमुकलीला उपचारासाठी रुग्णालयात नेले. वेळीच उपचार मिळाल्याने चिमुकलीचे प्राण वाचले आहेत. तिची प्रकृती उत्तम आहे. खाकी वर्दीतील देव माणूस हवालदार संपत गीते यांचे परिसातून कौतुक होत आहे.
Video: पुणे मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने वाचवले दोन जीव!
Video: महिलेचा कॉन्स्टेबलमुळे वाचला महिलेचा जीव…
Video: जवानाने प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी…
Video: पोलिसकाकाला ट्रकचालकांची लाठ्या काठ्याने मारहाण…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

