गिरीशचे अंजलीवर प्रेम अन् पहाटेच्या सुमारास घरात घुसला…

हुबळी (कर्नाटक): कर्नाटकात नेहा हिरेमठ हत्या प्रकरणानंतर आणखी एका युवतीची प्रेम प्रकरणातून चाकूने भोसकून हत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे. बेंडिगेरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत वीरपुरा ओनी भागात ही घटना घडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

अंजली अंबीगेरा (वय २१) असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. तर खून करणाऱ्या युवकाचे नाव विश्वा असून त्याला गिरीश नावानेही ओळखलं जाते. गिरीशने एकतर्फी प्रेमातून अंजलीची हत्या केली आहे. तो तिला ब्लॅकमेल करत होता. तुझंही हाल नेहा हिरेमठ सारखं होईल अशी धमकी त्याने दिली होती. आई वडिलांना न सांगता म्हैसूरला जाण्यासाठी तो दबाव टाकत होता,अशी माहिती समोर येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आज (बुधवार) सकाळी साडेपाच वाजता मुलीच्या घरात घुसला आणि झोपेतच तिच्यावर हल्ला केला. युवतीच्या कुटुंबियांनी युवकाला (वय २३) रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतरही त्याने चाकूने वार केले आणि पळून गेला. हत्या झालेल्या मुलीच्या दोन बहिणी आणि आजी घटनास्थळी होती. त्यांच्यासमोरच युवकाने तिला भोसकले. घरात तिला फरफटत नेलं आणि लाथाबुक्क्यांनी मारलं. त्यानंतर स्वयंपाक घरात ढकलून तिला चाकूने हल्ला केला.

एकतर्फी प्रेमातून नगरसेवकाच्या मुलीची कॉलेजमध्ये हत्या…

नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने सप्तश्रृंगी गडावरून उडी घेत संपवले जीवन…

प्रेमाची सैराट कहाणी! बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह अन् पुढे…

त्रिकोणी प्रेमकथा! मुलीचे एकाच वेळी दोघांशी प्रेमसंबध अन् पुढे…

पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात युवतीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न…

हृदयद्रावक! लग्न करायला निघालेल्या प्रेमीयुगुलाचा वाटेतच अंत…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!