पती-पत्नीमध्ये लग्नानंतर वारंवार भांडणं; अखेर नको ते झालंच…

मुंबई: मुंबईतील अँटॉप हिलमधील प्रतिक्षानगर येथे नवऱ्याने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंदादेवी यादव (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी आरोपी रामसिंगार याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

चंदादेवी यांचे पती रामसिंगार यादव याच्यासोबत लग्नानंतर वारंवार वाद होत होते. दोघांमध्ये रविवारी पून्हा शाब्दीक वाद झाला, यावेळी रामसिंगार याने पत्नी चंदादेवी हिला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या चंदादेवी यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान चंदादेवी हिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी आरोपी रामसिंगार याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत महिला यांचे घरात नेहमी वाद व्हायचे. रविवारी झालेल्या वादातच चंदादेवीचा बळी गेला. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास पोलिस करत आहेत.

नवविवाहित युवकानं धावत्या ट्रेनसमोर मारली उडी! व्हिडीओत म्हणाला, माझी बायको…

दिवाळीच्या दिवशीच लॉजवर आढळला व्यापाऱ्याचा मृतदेह…

रायगडमध्ये FB मित्राने घात केला ठेवले शरीरसंबंध अन्…

Live Video: वकीलाने सुनावणीवेळी महिलेला केलं Kiss…

विवाहित महिलेशी प्रेमसंबंध अन् आत्महत्या; पाहा WhatsApp स्टेटस मेसेज…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!