प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेला प्रियकराला पकडले अन् विवस्त्र करून…

लखनौ (उत्तर प्रदेश) : एक प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला होता. मुलीच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी त्याला पकडून विवस्त्र करून रस्त्याच्या मधोमध बेदम मारहाण केली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

युवकाला विवस्त्र करून मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली आहे. संबंधित व्हिडिओ हा बाराबंकीमधील पासिनपुरवा गावामधील असल्याची माहिती पुढे आली आहे. युवकाला देवा-फतेहपूर रस्त्याच्या मधोमध आधी गावकऱ्यांनी विवस्त्र केलं आणि नंतर बेदम मारहाण केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, युवक बेदम मारहाण होत असताना सोडण्याची विनंती करत आहे. मात्र, तरीही सर्वजण त्याला लाठ्या-काठ्या आणि बेल्टने मारहाण करत आहेत. प्रियकराच्या अंगावर काठ्या आणि बेल्टने मारहाण केल्याच्या खोल जखमाही स्पष्ट दिसत आहेत.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘प्रेयसी हिंदू तर प्रियकर मुस्लीम आहे. प्रेयसीचे कुटुंबीय, गावप्रमुख आणि उर्वरित गावकऱ्यांनी प्रियकराला मारहाण केल्याचा आरोप आहे. प्रियकर हा फतेहपूर परिसरातील बिलौली गावचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर प्रियकर अद्याप त्याच्या घरी पोहोचलेला नाही. पोलिस प्रियकराचा शोध घेत आहेत.

प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर दिला विजेचा शॉक अन्…

प्रियकराला रंगेहाथ पकडल्यानंतर गावकऱ्यांचा चढला पारा अन्…

प्रियकराला धडा शिकवण्यसाठी युवतीने केले नको ते कृत्य…

Video: नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये रंगेहात पकडलं अन् पुढे…

संतापजनक Video! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!