
नागपूर हादरलं! घरात तीन जणांचे मृतदेह पाहून शेजाऱ्यांना बसला धक्का…
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील शांतीनगर तुमान या गावामध्ये एका घरात 3 मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एकाच परिवारातील पती, पत्नी आणि मुलगा अशा तिघांचा मृतांमध्ये समावेश आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. शांतीनगर तुमान गावात इळपुंगटी हे कुटुंबीय राहत होते. आज (गुरुवार) सकाळी घरातील सदस्य काही बाहेर येत नव्हते. त्यामुळे शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले असता सर्वांना धक्का बसला. घरातील तिघांचे मृतदेह आढळून आले.
पती श्रीनिवास इळपुंगटी (वय 58),पत्नी पद्मालता इळपुंगटी (वय 54) आणि मुलगा वेंकट इळपुंगटी (वय 29) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. श्रीनिवास यांचा मृतदेह बेडरुममध्ये आढळून आला आहे. पत्नी पद्मालता आणि मुलगा वेंकटचा मृतदेह दुसऱ्या खोलीत आढळून आला आहे. मृतांचा राईस मिलचा कौटुंबिक व्यवसाय आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतले असून शव विच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली कुणी हत्या केली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
नागपूरमध्ये माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला…
हृदयद्रावक! मांजराने चावा घेतल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू…
भाजपच्या वर्षा पवार यांचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ…
पोलिस आयुक्तांच्या नावानेच बनवले बनावट फेसबुक अकाऊंट…
व्हॅलेंटाईन डेलाच प्रेयसीवरील संशयातून मित्राची हत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

