Video: अल्पवयीन मुलाने गुपचुप वडिलांची कार केली सुरू अन्…
मुंबई : एका १४ वर्षीय मुलाने आपल्या वडिलांना कार चालवताना पाहिले आणि त्यानेही तेच करण्याचा प्रयत्न केला. या मुलाने केलेल्या ‘पराक्रमाचा’ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक मुलगा आपल्या वडिलांची कार घराच्या मुख्य गेटमधून बाहेर काढतो. पार्किंगमधून कार काढून रस्त्यावर आणली. मात्र, रस्त्यावर गाडी आल्यानंतर ती वळवताना त्याने शेजारील ऑटोरिक्षाला धक्का दिला. त्यानंतर त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि तो एकामागून एक अनेक वाहनं व नागरिकांना धडकला. मुलाला कार कशी चालवायची हे माहित नसल्याने त्याने रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक दिली. नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या मुलाला कारसह पकडले. यानंतर पोलिसांनी मुलाच्या वडिलांकडून पाच हजार रुपये दंड घेऊन दोघांची सुटका केली.
View this post on Instagram
दरम्यान, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मुलाच्या वडिलांना अटक करण्याची मागणी केली. एकाने तर हे मूल 18 वर्षांचे होईपर्यंत वडिलांना तुरुंगात ठेवावे, अशी मागणी केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने आल्यामुळे अनेकदा अपघात होण्याचीही शक्यता असते. सध्या व्हायरल होत असलेल्या मुलाच्या बाबतीत हेच घडले आहे.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कुटुंबावर काळाचा घाला…
पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, तीन ठार…
भाविकांच्या बसला भीषण अपघात; ११ जागीच ठार; अनेकांना चिरडले…
Video: रायगडमधील भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…