भरधाव थार चालकाने दिलेल्या धडकेत दिल्लीत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू…

नवी दिल्लीः दिल्ली कॅन्टोन्मेंट परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या एका थार गाडीने मोटारसायकलला धडक दिल्याने, मोटारसायकलस्वार आणि मागे बसलेली व्यक्ती या दोघांचाही मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी आज येथे दिली.

मृतांची ओळख अंजू (वय अंदाजे ५०) आणि सुखबीर (वय अंदाजे ४५) अशी पटली आहे. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अपघातानंतर स्थानिकांनी थार चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी रोहिणीमध्ये दुग्धव्यवसाय चालवतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!