पुणे पोलिसांची ड्रग्जविरोधात मोठी कारवाई, कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त…

पुणे (संदिप कद्रे): पुणे पोलिसांनी पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि राजधानी दिल्लीमध्ये मागील दोन दिवसांत कारवाई करत तब्बल 4 हजार कोटी रुपयांचे दोन हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे कौतुक होत आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी सुद्धा ट्विट करत कौतुक केले आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी (ता. १९) वैभव उर्फ पिंट्या माने आणि त्याच्या साथीदारांना पकडून त्यांच्याकडून साडेतीन कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले. तेथूनच पोलिसांच्या कारवाईला सुरुवात झाली. पोलिसांनी आपली सर्व सुत्रे हलवत पुण्यात ठिकठिकाणी धाडी मारल्या. पिंट्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर विश्रांतवाडीतील भैरवनगरमधील गोदामातून 55 किलो ड्रग्ज जप्त केला. त्यानंतर दौंडमधील कुरकुंब एमआयडीसीमधील अर्थकेम कारखान्यावर छापा मारली. जिथे ड्रग्जची निर्मिती होत होते. येथे पोलिसांनी 600 किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले. त्याशिवाय या प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर सहभागी असल्याचेही तपासात समोर आले.

मिठाच्या पाकिटात लपवला ड्रग्ससाठा…
वैभन माने आणि हैदर शेख हे मागील वर्षी येरवडा कारागृहातून बाहेर आले आहेत. तेव्हापासून या दोघांनी ड्रग्सची विक्री करण्यास सुरुवात केली. पुण्यात मोठ्या प्रमाणात ते ड्रग्स विक्री करायचे. साधा ड्रग्स साठा पोलिसांच्या हाती लागेल म्हणून हैदरने शक्कल लढवली आणि हैदरने ड्रग्ससाठा मिठाच्या पाकिटात पुण्यातील विश्रांतवाडी भागात लपावला होता.

आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर…
19 फेब्रुवारी रोजी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्स जप्त केले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत 52 किलो पेक्षा आधिक मेफेड्रॉन मिळून आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एका किलो एमडीची किंमत 2 कोटी रुपये आहे. हे पुण्यात पकडलेले एम डी ड्रग्स मुंबईला पाठवण्यात येणार होते. मुंबईतील पॉल आणि ब्राऊन या ड्रग्स पेडलरकडे विक्री या ड्रग्सची विक्री होणार होती. पॉल आणि ब्राऊन हे दोघे ही परदेशी नागरिक आहेत. 2 दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 3 जणांना अटक केली होती. वैभव माने, अजय कारोसिया, हैदर शेख असे या 3 आरोपींची नावे आहेत. यातील माने आणि हैदर यांच्याविरोधात अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

पुणे पोलिसांनी कुठे किती ड्रग्ज पकडले ?
दिल्लीत मिळून आले आणखी 600 किलो एम डी ड्रग्स
दिल्लीतील दुसऱ्या कारवाईत 1200 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
अवघ्या ३ दिवसात पुणे पोलिसांनी जप्त केले 4000 कोटी रुपयांचे 2000 किलो एम डी ड्रग्स
पुणे पोलिसांचे पुणे, कुरकुंभ सह दिल्लीत छापेमारी
गेल्या 3 दिवसात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेली कारवाई
फेब्रुवारी 18 : सोमवार पेठेतील छापेमारी मध्ये 2 किलो एम डी जप्त
फेब्रुवारी 19 : विश्रांतवाडी येथील गोदामातून 100 कोटीपेक्षा अधिक किंमतीचे 55 किलो एम डी जप्त
फेब्रुवारी 20: कुरकुंभ एम आय डी सी मधील एका कारखान्यात 1100 कोटी रुपयांचे ड्रग्स आले आढळून
फेब्रुवारी 20 : पुणे पोलिसांची थेट दिल्लीत कारवाई. 800 कोटी रुपयांचे 400 किलो एम डी केले हस्तगत
फेब्रुवारी 21 : पुणे पोलिसांच्या आणखी एका कारवाई मध्ये दिल्लीत मिळून आले 1200 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे 600 किलो एम डी

Video: पुणे शहरात एम.डी. ड्रग्ज रॅकेटच्या आंतरराष्ट्रीय टोळीस अटक…

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई; दोन पोलिस बडतर्फ…

पुणे शहरात परदेशी व्यक्तीकडून ३० लाखांचे कोकेन जप्त: अनिता हिवरकर

खडकी पोलिसांनी दोन महिलांना केली अटक; मुद्देमाल हस्तगत…

पोलिस आयुक्त अमितेश कुमार ऍक्शन मोडवर; गुन्हेगारांमध्ये धडकी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!