पोलिस आयुक्तांच्या नावानेच बनवले बनावट फेसबुक अकाऊंट…

नागपूर: सायबर गुन्हेगारांनी चक्क नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या नावाचे बनावट फेसबुक खाते तयार केले आहे. शिवाय, या खात्यावरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात आल्याचे समोर आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

मोटिव्हेशनल स्पीकर, टेक्नोसॅव्ही अधिकारी आणि तितकेच सोशल माध्यमांवर सक्रिय असणारे अधिकारी म्हणून पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांची एक खास ओळख आहे. फेब्रुवारीच्या महिन्यात त्यांनी नागपूर शहराचे पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे. नागपूर शहर विविध हत्या आणि अपराधांच्या घटनांनी हादरल्यामुळे पदभार स्वीकारताच स्व:ता रस्त्यावर उतरून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दुसरीकडे, त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोनच दिवसांत सायबर गुन्हेगाराने त्यांचे बनावट फेसबुक खाते तयार केले. त्यानंतर शहरातील अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट देखील पाठविण्यात आल्या आहेत.

दरम्यान, नागपूर शहरचे माजी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे असेच फेक अकाउंट उघडून फसवणूक करण्यात आली होती. त्यानंतर त्यातील आरोपींना अटक करण्यात आली होती. तर असाच एक प्रकार माजी पोलिस महासंचालक भूषण कुमार उपाध्याय यांच्या सोबत देखील घडला होता. उत्तर प्रदेशच्या आझमगड येथील रहिवासी असलेल्या संतोष कुमार या संशयित आरोपीने माजी पोलिस महासंचालक उपाध्याय यांच्या नावाने फेसबुकवर अकाऊंट तयार करून अनेकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. या पूर्वी झालेले प्रकार लक्षात घेता पोलिस यंत्रणा सतर्क राहून अशा सायबर गुन्हेगारांचा तपास करत आहे.

पोलिस डॉ. रवींद्र सिंगल यांच्या नावे बनावट फेसबुक खाते तयार करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचा शोध घेत असून कुणीही अशा भूलथापा अथवा बनावट फेसबुक खात्यांवर पडताळणी केल्या शिवाय विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

सायबर गुन्हेगाराने खासदाराला घातला लाखो रुपयांचा गंडा…

युवतीची फसणवूक करणाऱ्यास सायबर पोलिसांनी घातल्या बेड्या…

पोलिस आयुक्त अमितेश कुमार ऍक्शन मोडवर; गुन्हेगारांमध्ये धडकी…

थांबा! राम मंदिराच्या नावावर फ्री रिचार्जची लिंक आली आहे…

आयटी युवतीची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक; पण परत मिळाले पैसे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!