
नात्याचा शेवट! अल्पवयीन दीर आणि वहिनीला रंगेहाथ पडकले…
लखनौ (उत्तर प्रदेश) : देशभरात सौभाग्याचं प्रतीक असलेला करवा चौथ साजरा केला जात असतानाच अल्पवयीन दिर आणि महिलेला तिच्या नवऱ्याने रंगेहाथ पकडले. त्यानंतर आरोपीने लहान भावाचा टॉवेलने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे.
बदायूंमधील बिलसी पोलिस स्टेशन हद्दीतील अहमदगंज गावात हे प्रकरण घडले आहे. एक विवाहित महिला आणि तिचा 16 वर्षीय दीर यांचे अनैतिक संबंध होते. पती घराबाहेर गेला की वहिनी आपल्या दिरासोबत खोलीत वेळ घालवत असे. दोघांना नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर नवऱ्याला धक्का बसला. त्याने पत्नी आणि भावाला समजावून सांगितले. या घटनेनंतर दोन्ही भावांमध्ये वारंवार वाद होऊ लागले.
अहमदगंज गावात बाजरीच्या शेतात मृतदेह आढळून आला होता. त्याच्या गळ्यात स्कार्फ होता. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मृताच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अल्पवयीन मुलगा आणि त्याचा मोठा भाऊ यांच्यात अनेकदा घरगुती वाद होत असल्याचे तपासात समोर आले आहे. संशयाच्या आधारे पोलिसांनी मृताच्या मोठ्या भावाला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याने खरे सांगितले.
पोलिसांना त्याने सांगितले की, ‘भावाला औषध देण्याच्या बहाण्याने परौली येथे घेऊन गेला होता. यावेळी निर्जन जागा पाहून दोन्ही भावांनी एकत्र बसून गांजा ओढला. त्यानंतर आरोपीने लहान भावाचा टॉवेलने गळा आवळून खून केला. पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधांमुळेच लहान भावाची हत्या केली.’ दरम्यान, पोलिसांनी मोठ्या भावाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
Video: दीरासोबत लग्न करण्यासाठी दोन वहिनींमध्ये जोरदार राडा…
वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध; दिर बलात्कार अन् आत्महत्या…
वहिनी घरात एकटीच असल्याचे पाहून दीर घुसला घरात अन्…
वहिनीने अनैतीक संबधातून केली दीराची हत्या अन् म्हणाली नवरा नामर्द…
भाचा आणि मामीचे प्रेमसंबंध; मामाने घेतला मोठ निर्णय…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!