माता न तू वैरिणी! प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाला दगडाने ठेचलं…

सातारा : आईने आणि तिच्या प्रियकराने दोन साथीदारांच्या मदतीने मुलाला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे संबंधित युवकाचा जीव वाचला आहे. कराड तालुक्यातील वराडे येथे ही घटना घडली असन, पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. आरोपी आई आणि तिचा प्रियकर पुण्याच्या हवेली तालुक्याचे रहिवासी आहेत.

प्रशांत (वय २४) या युवकाची आई शोभा हिचे जयेंद्र गोरख जावळे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या अनैतिक संबंधांना प्रशांत वारंवार विरोध करत होता, त्यामुळे आई शोभा हिने तिचा प्रियकर जयेंद्र जावळे याच्या मदतीने प्रशांतचा खून करण्याचा कट रचला. जयेंद्र जावळे याने त्याचे साथीदार सिद्धार्थ व्हावळे आणि अकबर शेख या दोघांना मदतीला घेऊन प्रशांतला रिक्षाने उंब्रजमधून वराडे येथील शेतात आणले. त्याठिकाणी त्यांनी प्रशांतला दारू पाजली. तसंच दगडाने ठेचून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रशांतला जखमी अवस्थेमध्ये सोडून ते तिथून पसार झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वराडे गावाच्या हद्दीत सागवानच्या शेतामध्ये बुधवारी रात्री प्रशांत शेंडगे हा युवक जखमी अवस्थेत आढळला होता, त्यानंतर त्याला पोलिसांनी रुग्णालयात नेले. सध्या प्रशांत याच्यावर उपचार सुरू आहेत.

शोभा (वय 38, रा. काटेपुरम चौक, पिंपळे गुरव, सांगवी, ता. हवेली, जि. पुणे), जयेंद्र गोरख जावळे (वय 40, रा. सांगवी, ता. हवेली. जि. पुणे), सिद्धार्थ विलास वाव्हळे (वय 25, रा. मातोश्रीनगर, वांगी रोड, परभणी), अकबर मेहबूब शेख (वय 25, रा. निकाळजे वस्ती, बाणेरगाव, बालेवाडी स्टेडियमजवळ, ता. हवेली) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. जखमी झालेल्या प्रशांतवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

माता न तू वैरिणी! आईने चिमुकलीच्या नाकाला चिमटा लावला अन्…

माता न तू वैरिणी! मुलीला जिवंत जाळून मारलेस, तर तुला धनलाभ होईल…

माता न तू वैरिणी! अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा म्हणून चिमुकल्याचा खून…

माता तू न वैरिणी! चिमुकलीला 14व्या मजल्यावरून फेकलं…

धक्कादायक! चिमुकलीने काका घरी येत असल्याचे सांगितले अन् नको ते घडलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!