
धक्कादायक! मोबाईलच्या अतिवापर, तिसरीत शिकणाऱ्या मुलानं चिमुकलीवर अत्याचार…
पुणे : एका तिसरीत शिकणाऱ्या मुलाने एका ३ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. पीडित मुलीनं अत्याचाराची माहिती आईला दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले आहे. त्याला ज्युवेनाईल जस्टिस बोर्डासमोर हजर केले असता मुलाला जामीन मिळाला आहे. न्यायालयाने मुलाला आई-वडिलांच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले आहेत.
पुणे शहरातील कोंढवा परिसरात ही घटना घडली आहे. आरोपी मुलगा आणि पीडित मुलगी हे दोघंही एकमेकांचे शेजारी आहेत. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी आरोपीच्या घराच्या परिसरात एकटी दिसल्यानंतर आरोपी मुलाने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. अत्याचाराच्या घटनेनंतर पीडित मुलीने या घटनेची माहिती आपल्या आईला दिली. मुलीसोबत घडलेला धक्कादायक प्रकार लक्षात आल्यानंतर पीडितेच्या आईनं कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यानंतर पोलिसांनी पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच बाल हक्कांसाठी काम करणाऱ्या एनजीओच्या प्रतिनिधींनी मुलीला विश्वासात घेत, तिची चौकशी केली, यानंतर तिने सगळा घटनाक्रम सांगितला.
इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या ९ वर्षांच्या मुलानं अशाप्रकारे अत्याचार केल्याची माहिती मिळाल्यानंतर धक्का बसला. पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी त्याचं वय पाहता मुलाला ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाने तातडीने जामीन दिला आहे. मुलाला पालकांच्या ताब्यात देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सोशल मीडिया आणि मोबाईलच्या अतिवापरातून मुलाने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
पुणे हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला युवतीवर सामूहिक बलात्कार…
पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…
पुणे जिल्ह्यात लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार…
पुणे शहरात कंपनीत एचआर पदावर काम करणाऱ्या युवतीवर बलात्कार…
धक्कादायक! पुणे जिल्ह्यातील शाळेच्या बाथरूमध्ये मुलीवर बलात्कार…

