
धक्कादायक! चिमुकलीने काका घरी येत असल्याचे सांगितले अन् नको ते घडलं…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका महिलेने आपल्या प्रेम संबंधात अडथळा होऊ नये म्हणून स्वतःच्याच दोन वर्षांच्या चिमुकलीला छतावरून खाली फेकून देऊन खून केल्याची धक्कादायक घटना बरेली येथे घडली आहे. ‘माता न तूं वैरिणी’ या म्हणीचा प्रत्येय येथे आला आहे.
चिमुकलीचे वडील मुरशिद यानी तक्रारीत म्हटले आहे की, ’21 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:15 वाजता, त्याची पत्नी अनामाने त्यांच्या भाड्याच्या घराच्या छतावरून त्यांची मुलगी अमानूरला फेकून दिले आणि तिची हत्या केली. पण, मुलीचा छतावरून खाली पडून मृत्यू झाल्याचे पत्नीने सांगितले होते. मुरशिदला त्याच्या मुलीच्या मृत्यूबाबत संशय होता. त्याने जवळच असलेल्या CCTV कॅमेऱ्यांचा शोध घेतला, त्यात त्याला दिसले की, पत्नीने मुलीला छतावरून खाली फेकून दिले. हे फुटेज पोलिसांना दाखवले.’
मुरशिद याने 15 नोव्हेंबर रोजी, पत्नी फोनवर कोणाशी तरी बोलत असल्याचे पाहिले होते. यानंतर दोघांमध्ये वाद झाला होता. मुलगी नेहमीच आपल्या वडिलांना घरात येणाऱ्यांविषयी सांगायची, त्यामुळे तिची उपस्थिती तिच्या आई आणि वडिलांच्या नात्यात अडथळा ठरली. या कारणामुळे, मुलीला छतावरून फेकून मारले.
पोलिसांनी पत्नीवर हत्येचा आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. सीबीगंजचे निरीक्षक सुरेश गौतम यांनी सांगितले की, ‘पतीने पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिलेने तिचा गुन्हा कबूल केला आहे. जिल्हा अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्यानंतर, मुलीचं शव उचलून शवविच्छेदन करण्यात येईल, ज्यामुळे तिच्या हत्येचे कारण स्पष्ट होईल.’
सरिताचे घराशेजारी राहणाऱ्या विकाससोबत प्रेमसंबंध अन् आता जेल…
वहिनीच्या प्रेमात आंधळा झाला दीर अन् नवऱ्याला समजताच…
एका गोणीत सात तुकडे सापडलेल्या मृतदेहाचे गुढ उकललं; प्रेम प्रकरणातून…
प्रेम प्रकरण! योगा टीचरला विवस्त्र करून जमिनीत पुरलं पण जिवंत बाहेर आली अन्…
मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडल्यावर गावभर रंगली प्रेमाची चर्चा…
प्रेम! जवानाने मैत्रिणीला भेटायला बोलावले अन् निर्जन स्थळी घेऊन गेला…

