मिञाचा खुन करणाऱ्या आरोपीस रावेत पोलिसांनी केली अटक…
पुणे (सुनिल सांबारे): रावेत पोलिस स्टेशन हद्दीमधील किवळे मुकाई चौकाजवळ निर्माण ग्रुप यांचे साईटवर मिञाचा खुन करणाऱ्या आरोपीस रावेत पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
रावेत पोलिस स्टेशन हद्दीत .०४/०९/२०२३ रोजी निर्माण माईन स्टोन साईड वरील बेसमेन्ट मधील पञ्याचे रुममध्ये आरोपी दिनेश रामविलास यादव (वय २१ वर्षे, रा. निर्माण माईन स्टोन साईड वरील बेसमेंन्टमधील पञ्याच्या रुममध्ये मुंबई पुणे हायवे जवळ रावेत ता. हवेली जि. पुणे मुळ रा. बिरैची कला, पोस्ट-खंबाता. रिघवली, जि. बस्ती, राज्य उत्तरप्रदेश) याने कामगार विवेक गणेश पासवान याला किरकोळ भांडणाच्याकारणावरुन तोंडावर सिंमेटची वीट ३ ते ४ वेळा मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले आहे. सदर घटनेबाबतशिवकुमार घनश्याम प्रजापती (वय १९) यांनी फिर्याद दिल्याने रावेत पोलिस स्टेशन गु.र.नं. ३२८ / २०२३भा.द.वि.कलम.३०२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी हा पळून गेल्याने पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह. पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त श्री. परदेशी यांनी गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना व आदेश दिले होते.
सदर गुन्हयाचा तपास करीत असताना आरोपी दिनेश रामविलास यादव हा गुन्हा केल्यानंतर सी.सी.टी.व्ही फुटेज प्राप्त केले यामध्ये आरोपी हा सेंट्रल चौक देहुरोड येथून एका टॅम्पो मध्ये बसुन मुंबई बाजुकडे गेल्याचे दिसून आले. त्यानंतर आरोपी याचे मिञ व जवळचे नातेवाईक यांच्याकडे चौकशी करीत असताना ०७/०९/२०२३ रोजी सपोनि / पी.आर. शिकलगार यांना गोपनीय बातमी मिळाली की, सदर आरोपी शिवाजी चौककल्याण येथे आहे. अशी माहिती प्राप्त होताच रावेत पोलिस स्टेशन तपास पथक रवाना होऊन सदर ठिकाणी जाऊनआरोपीस शिताफीने पकडून रावेत पोलिस स्टेशन येथे आणले.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह. पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त श्री. परदेशी, पोलिस उप-आयुक्त काकासाहेब डोळे, सहा पोलिस आयुक्त पदमाकर घनवट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांचेमार्गदर्शनाखाली सपोनि / पी आर शिकलगार, सपोनि / विशाल जाधव, पोलिस उप निरीक्षक रविंद्र पन्हाळे,पोहवा / ४२५ कोळगे, पोहवा / ६७५ गायकवाड, पोशि/ नंदलाल राऊन, रमेश तांबे, संतोष तांबे, विजयकुमार वाकडे,रमेश ब्राम्हण, संतोष धवडे व मपोना धाकडे यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये फिल्मी स्टाईलने भरदिवसा खून; दोघांना अटक…
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना घेतले ताब्यात…
पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…
पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरले! युवकाची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…