वहिनीच्या खोलीत मध्यरात्री घुसताना एकाला दिराने पाहिले अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश) : पोलिस कॉन्स्टेबलचे एका विवाहितेसोबत प्रेमसंबंध होते. रात्रीच्या अंधारात सिव्हिल ड्रेसमध्ये पोलिस कॉन्स्टेबल महिलेच्या घरात घुसल्याचे दिराने पाहिले आणि आरडाओरड सुरू केली. ग्रामस्थांनी कॉन्स्टेबलला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर एसएसपींनी कॉन्स्टेबलला निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून समोर आली आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

महिलेची काही दिवसांपूर्वी डायल 112 चे कॉन्स्टेबल केसरीनंदन यांच्याशी भेट झाली होती. दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले आणि पुढे बोलणं सुरू झाले. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. संवादामुळे त्यांची जवळीक वाढली, पण कुणालाच त्याची माहिती नव्हती. अचानक एके दिवशी महिलेचा तिच्या दिराशी वाद झाला. दिराला धडा शिकवण्यासाठी तिने तिच्या प्रियकराला म्हणजेच पोलिस कर्मचाऱ्याला बोलावले आणि दिराला अटक झाली.

पोलिस आणि वहिनीच्या वागण्यावरून दीराच्या मनात शंका आली. पोलिस ठाण्यातून सुटका झाल्यानंतर तो बाहेर आला आणि वहिनीवर लक्ष ठेवू लागला. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक कॉन्स्टेबल सिव्हिल ड्रेसमध्ये महिलेच्या खोलीत घुसला. हे पाहताच दिराने दार लावून बाहेर आरडाओरडा करायला सुरुवात केली. ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहोचून पोलिसाला पकडले आणि बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिस असल्याचे सांगितल्यानंतरही गावकऱ्यांनी त्याला खूप मारहाण केली. संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, एसएसपी डॉ. गौरव ग्रोवर यांनी केसरीनंदनला तत्काळ निलंबित केले. तसेच विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दीर-वहिनीचे प्रेमसंबंध अन् मृत्यूनंतरही चार महिने ‘एक दुजे के लिए’…

वहिनीचे दिरासोबत प्रेमसंबंध अन् जीव गेला नवऱ्याचा…

दिराने केले विधवा वहिनीसोबत लग्न अन् नको ते घडलं…

दिराच्या प्रेमात अक्षरशः वेडी झाली वहिनी अन् पुढे तर…

नात्याचा शेवट! अल्पवयीन दीर आणि वहिनीला रंगेहाथ पडकले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!