हनिमूनच्या रात्रीच नवरी रडत-रडत पडली खोलीबाहेर…

लखनौ (उत्तर प्रदेश) : विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. हनिमूनच्या रात्री नवरदेवाने आपल्या वधूला मोबाईलमध्ये नको ते दाखवल्यामुळे नवरी रडतच खोली बाहेर आली. नवरदेवाची तक्रार नातेवाईकांकडे केल्यानंतर पोलिसांकडेही गु्न्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये ही घटना घडली आहे. नवरदेवाने हनिमूनच्या रात्री मोबाईलमध्ये काही तरी दाखवल्यामुळे नवरी रडत खोलीबाहेर आली आणि तिने सासरच्या मंडळींना वराच्या कृत्याबद्दल सांगितले. त्यावेळी सासरच्या लोकांनी वधूचं ऐकले नाही, असा नवरीचा आरोप आहे. नवरीने तिच्या पालकांना फोन करून बोलावले. नवरेदवाच्या कृतीवर नवरीच्या आई-वडिलांनी आक्षेप घेतला. कुटुंबियांनी समजावून सांगितल्यानंतरही नवरदेवामध्ये सुधारणा न झाल्याने वधू आपल्या माहेरी परतली, आता तिने नवरदेव आणि तिच्या सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जसराना येथील मदनपूर गावात राहणाऱ्या युवतीचे लग्न आग्राच्या ताजगंज येथील बरौली अहिर गावात राहणाऱ्या शुभमसोबत झाले आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिच्या वडिलांनी लग्नासाठी 35 लाख रुपये खर्च केले. मोठ्या थाटामाटात लग्नाचे विधी पूर्ण केले आणि हुंडाही दिला. लग्नाच्या रात्री तिचा पती तिच्या जवळही आला नाही. आपले लग्न त्याच्या इच्छेविरुद्ध झाले असल्याचे सांगितले. शिवाय, दुसऱ्या मुलीवर प्रेम असून, मला तिच्याशीच लग्न करायचे आहे, असे तो म्हणाला आणि मोबाईलमधील प्रेयसीचा फोटो दाखवला. नवऱ्याचं बोलणं ऐकताच नवरीच्या पायाखालची जमीन सरकली. तिचा आनंद आणि नव्या आयुष्याची स्वप्नं क्षणार्धात भंग पावली.

हनिमूनच्या रात्रीच नवरदेवाने प्रेयसीचा फोटो दाखवल्यामुळे नवरी मध्यरात्री रडतच खोलीबाहेर आली होती. ‘मी आई-वडिलांना सांगितल्यावर ते माझ्या सासरच्या घरी आले. मात्र, भविष्यात असे काही होणार नाही, अशी ग्वाही सासरच्या मंडळींनी दिली. आश्वासन देऊनही पतीच्या वागण्यात फरक पडला नाही’, असा पीडितेचा आरोप आहे. कंटाळलेली पीडित मुलगी तिच्या माहेरच्या घरी परतली आणि आता तिने तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

हनिमूनच्या रात्री समजलं की नवरा समलिंगी अन् पुढे…

हनिमूनच्या रात्री इमारतीवरून नग्नावस्थेत पडून नवरीचा मृत्यू…

हनिमूनच्या रात्रीपासूनच नवरीला त्रास सुरू; अखेर नको ते घडलं…

हनिमूनच्या रात्री नवरदेव लागला मोठ-मोठ्याने ओरडायला…

हनिमूनदरम्यान नवऱ्याच्या चुकीने नवरीचा धक्कादायक मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!