
विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; रॅगिंगचा प्रकार…
सोलापूर: बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील एका महाविद्यालयात 11 वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला चार विद्यार्थ्यांनी खोलीत घुसून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रसिक बनसोडे असे या मारहाणीत जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सध्या त्याच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पीडित विद्यार्थी प्रसिक बनसोडे याने दिलेल्या माहितीनुसार, ‘चार विद्यार्थ्यांनी रूममध्ये जबरदस्तीने प्रवेश करून स्टम्पने मारहाण केली. तब्बल तीन तास मला मारहाण करण्यात आली आहे. रूम स्वच्छ करणे, झाडू मारायला लावल्यावर कामे करण्यास नकार दिल्याने मारहाण करण्यात आली. याआधीही महाविद्यालयात असे प्रकार घडले आहेत. महाविद्यालय प्रशासन दोषी विद्यार्थ्यांना पाठीशी घालत आहे.’

दरम्यान, या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पालक वर्गातूनही संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर संबंधित विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच महाविद्यालय प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
सोलापूर! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने बॉईज हॉस्टेलमध्ये उचललं टोकाचं पाऊल…
सोलापूर! युवा वकिलाची आत्महत्या; चिठ्ठीत आईवर खळबळजनक आरोप…
सोलापूर! MBBSचे शिक्षण घेणाऱ्या साक्षीने टोकाचा निर्णय का घेतला…
सोलापूरमध्ये नर्तिकेवरून गोळीबार; तू मला काय भुरटा समजतो काय…
लातूर-सोलापूर महामार्गावर रक्तरंजित थरार; एकाची हत्या तर मैत्रिणीच्या छातीत खुपसला चाकू…

