
युवकाने अल्पवयीने मुलीला प्रपोज केलं पण तिला हे आवडलं नाही; अखेर…
सोलापूर : एका युवकाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. वेणूगोपाळ विटकर असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. आरोपी हा मागील काही दिवसापासून अल्पवयीन मुलीला त्रास देत होता.
युवतीच्या वारंवार पाठीमागे जाणे, तिला बोलण्याचा प्रयत्न करणे, अशा प्रकारे त्याने अल्पवयीन मुलीला त्रास दिला होता. आरोपी युवकाने मुलीला प्रपोज केल्यानंतर तिने हा संपूर्ण प्रकार घरी सांगितला होता. युवतीच्या कुटुंबियांनी मुलाला समज दिली होती. मात्र त्यानंतर देखील त्याने त्रास देणं, सुरुचं ठेवले होते. याच त्रासाला कंटाळून आपल्या मुलीने आत्महत्या केल्याची फिर्याद अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिली आहे. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 108 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कलम 12 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेनंतर पालकांनी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, युवतीने आत्महत्या केल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
डॉक्टरचे मेहुणीसोबत जुळले प्रेमसंबंध अन् रात्रीच्या सुमारास नको ते घडलं…
सासू आणि जावयाच्या प्रेमसंबधातून बाळाचा झाला जन्म अन् पुढे…
पुणे शहरात आईसोबत प्रेमसंबंधाच्या संशयावरून युवकावर कोयत्याने वार…
‘प्रेमात माझी वाट लागली’, स्टेटस ठेवलं अन् घेतला जगाचा निरोप…
मुंबईत प्रेमी युगलाने घेतली रेल्वे एक्सप्रेससमोर उडी…

