
हृदयद्रावक! बंगळुरुच्या इंजिनिअरनं मृत्यूपूर्वी दिलं बाळाला गिफ्ट; सांगितलं 2038 मध्ये उघड…
बंगळुरु (कर्नाटक): बंगळुरुमधील एआय इंजिनिअर अतुल सुभाष (वय ३८) यांनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. अतुल सुभाष यांनी त्यांच्या मुलासाठी एक खास गिफ्ट ठेवले आहे. पण, हे गिफ्ट त्याने 2038 मध्येच उघडावे अशी विनंती केली आहे. अतुल यांचा मुलगा सध्या चार वर्षाचा आहे. तो 2038 साली म्हणजेच आणखी 14 वर्षांनी 18 वर्षांचा होईल.
अतुल सुभाष बंगळुरु शहरातील एका प्रायव्हेट फर्ममध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये DGM पदावर काम करत होते. अतुल यांनी मृत्यूपूर्वी 40 पानांची सुसाईड नोट तसंच तासभराचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी पत्नी निकिता सिंघानिया आणि त्याच्या सासरच्या मंडळींवर आरोप केले आहेत. अतुल यांच्या खुलाशानंतर निकितावर सोशल मीडियावरुन जोरदार टीका होत आहे. अतुल सुभाष यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये मुलासाठी खास मेसेज लिहिला आहे. त्यांनी सांगितलं की, ‘मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तुझ्यासाठी मला माझा जीव द्यावा लागेल, याचा कधी विचार केला नव्हता. पण, दुर्दैवानं मी तुझ्यासाठी जीव देतोय. मला कधी-कधी एका त्रासाशिवाय तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही. तुझा वापर मला ब्लॅकमेल करण्यासाठी होत आहे. तुझ्या माध्यमातून माझ्याकडून जास्तीत जास्त पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात आहे. मरणंच माझ्यासाठी चांगलं आहे. मी जे पैसे कमावतोय, त्यामुळे माझे शत्रू आणखी बळकट होत आहेत. मी कमावलेल्या पैशांचा वापर मला बर्बाद करण्यासाठी केला जात आहे. माझ्याच करातून मिळालेल्या पैशांमधून हे कोर्ट, हे पोलीस आणि ही संपू्र्ण सिस्टीम मला, माझ्या कुटुंबीयांना आणि माझ्यासारख्या अनेकांना त्रास देत आहे. मी जगलो नाही तर हा पैसा देखील नसेल. माझे आई-वडील तसेच भावाला त्रास देण्याचं कोणतंही कारण शिल्लक राहणार नाही.’
अतुलचे भाऊ विकास सुभाष यांनी सांगितले की, ‘अतुलचं लग्न 2019 साली झाले होते. अतुलची पत्नी आणि सासरच्या मंडळींनी त्याला अनेक खोट्या आरोपांमध्ये अडकवले होते. त्यामुळे अतुल खूप त्रस्त होता. याच त्रासातून त्याने जीव दिला. पोलिसांनी या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.’
अतुल आणि निकिता सिंघानिया यांची भेट एका मॅरेज वेबसाईटवर झाली. या दोघांनी 2019 साली लग्न केले. 2020 साली एक मुलगा झाला. अतुलच्या आरोपानुसार निकिता 2021 मध्ये मुलासह माहेरी निघून गेली. ती उत्तर प्रदेशातील जौनपुरची आहे. जौनपुरच्या पोलीस स्टेशनमध्ये अतुलवर वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या. या तक्रारीच्या माध्यमातून आपला छळ झाला, असा आरोप अतुलने केला आहे. निकिता हिने अतुलवर एकूण 9 केस दाखल केल्या होत्या. त्यामध्ये हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोपही होता.
निकिता ही दिल्लीमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होती. अतुलची आई गृहिणी आहे. तर भावाचं कपड्याचं दुकान आहे. निकिताच्या वडिलांचं निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूसाठीही निकीतानं अतुलला जबाबदार धरलं होते. निकिताचं तिच्या सासू सासऱ्यांशीही जमत नव्हते, असा आरोप अतुल यांनी केला आहे. ती लग्नानंतर फक्त दोन दिवस सासरी गेली होती. त्या काळात ती फक्त एकदा आपल्या आई-वडिलांना भेटली, असा आरोप अतुल यांनी केला होता. इतकंच नाही तर निकितामुळे आपल्या आई-वडिलांनी नातवाचं तोंडही पाहिलं नाही, असा आरोप अतुल यांनी व्हिडिओमध्ये केला आहे.
महाराष्ट्रातील पत्नी पीडित पुरुषांचा मेळावा; सरकारकडे केली मागणी…
हृदयद्रावक घटनेने पुणे हादरले! नवजात बालकाच्या तोंडावर चक्क प्लास्टिकची पिशवी बांधली अन्…
हृदयद्रावक! ट्रॅक्टरच्या गिअरवर पडला पाय अन् दोन बहिणींचा चिरडून मृत्यू…
हृदयद्रावक! पती-पत्नीचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार…
हृदयद्रावक! दिवाळीच्या दिवशी स्वयंचलित दार झाले लॉक; व्यापाऱ्यासह तिघांचा जळून मृत्यू…
हृदयद्रावक Video! लेकाला वाचवण्यासाठी आई त्याच्या अंगवार पडली, बापाच्या विनवण्या…

