भिक्षुकाचा अपघाती मृत्यू, गोधडीत सापडले लाखो रुपये…

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात डोणगाव रोडवर सायकलस्वार भिक्षुकाला अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिली. या अपघातात दीपक मोरे हा भिक्षुक गंभीरित्या जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे असलेल्या गोधडीत लाखो रुपयांचे घबाड सापडले आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेला भिक्षुकाची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी जाऊन तपासणी केली. त्याची सायकल, एक गोधडी आणि पिशवी आढळून आली. या […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! गरोदर महिलेची आत्महत्या; पोटातील बाळही दगावले…

नाशिकः मनवेल येथील एका विवाहीत गरोदर महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनवेल (ता. यावल) येथील शितल उर्फ रूपाली विजय कोळी (वय २२) या गरोदर होत्या. घरात असलेल्या छताच्या आडव्या लोखंडी एंगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. सदर प्रकार कुटुंबाच्या निदर्शनास […]

अधिक वाचा...

पुणे शहरात गरोदर असल्याचे सांगून युवकाकडे मागितली खंडणी…

पुणे : एका महिलेने शारीरिक संबंधांची माहिती घरच्यांना सांगते, तर कधी गरोदर असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत युवकाकडे वीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार डिसेंबर २०१९ ते २८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान हडपसरमध्ये घडला आहे. या प्रकरणी लोहगाव येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून ३० वर्षीय महिलेवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात […]

अधिक वाचा...

हिंजवडी येथील कंपनीमध्ये काम करणाऱ्या युवकाची आत्महत्या…

पुणे : विहिरीत उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना बाणेर येथे कळमकर चौकाजवळील विहिरीत घडली आहे. स्वप्नील राऊत असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या आत्महत्येमागे मानसिक आजार व घरगुती वाद असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. ही घटना ३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली आहे. स्वप्नील हा मूळ बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील आजोबा कॉल गर्लला भेटले अन् पुढे…

पुणे : एक ज्येष्ठ नागरिक कॉल गर्लला भेटल्यानंतर पोलिसांच्या कारवाईची भीती दाखवून तब्बल ३० लाख रुपयांना लुबाडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी ३० लाख रुपयांना लुबाडल्यानंतर दर महिन्याला एक लाख रुपयांची खंडणी मागितली होती. ज्येष्ठ नागरिकाने ज्योती नावाच्या […]

अधिक वाचा...

ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या चौकशीत धक्कादायक खुलासे…

पुणे: ससून रुग्णालयातून फरार झालेल्या ललित पाटील याला अटक केल्यानंतर चौकशीत आता धक्कादायक असे खुलासे समोर येऊ लागले आहेत. पुढील तपास पोलिस करत आहेत. ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर खळबळ उडाली होती. ससून रुग्णालयात बसून ललित पाटील ड्रग्ज रॅकेट चालवत असे. रुग्णालयात जास्त काळ राहण्यासाठी तो डॉक्टरांना पैसे द्यायचा. रुग्णालयातील कर्मचारी आणि पोलिसांना पैसे […]

अधिक वाचा...

रांजणगाव देवस्थानमध्ये विश्वस्तांच्या अनुपस्थितीत गुंड गजानन मारणेचा सत्कार…

शिरुर (तेजस फडके) : अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरात 16 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याचा रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरात देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांच्या अनुपस्थितीत गजानन मारणे याचा दर्शन घेतल्यानंतर सत्कार करण्यात आला. मात्र गुंड मारणेचा हा सत्कार गावातील काही नेत्यांना ऐन ग्रामपंचायत […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची आत्महत्या…

पुणे : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उरूळी कांचन परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सोनाली धनाजी धुमाळ (वय 25, रा. टिळेकर मळा, उरुळी कांचन, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे कारण […]

अधिक वाचा...

पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याने विधवा महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी…

पुणे : सफाई कामगार असलेल्या विधवा महिलेकडे शरीर सुखाची मागणी करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक, ठेकेदारासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आरोग्य निरीक्षक मंगलदास माने, ठेकेदार शिवाजी सुळ, आणि संजय वाघमारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत बिबवेवाडीतील एका ४० वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलिस […]

अधिक वाचा...

संतापजनक! अल्पवयीन गतीमंद मुलगी सहा महिन्यांची गरोदर…

पालघर: पालघरच्या मनोर पोलिस ठाणे हद्दीतील एक 14 वर्षाची गतीमंद अल्पवयीन मुलगी सहा महिन्यांची गरोदर राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादीनंतर मनोर पोलिस ठाण्यात दोन आरोपींविरोधात 376 आणि पोक्सोसह इतर विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी गतीमंद असल्याचा फायदा घेऊन दोन्ही आरोपी पीडितेवर गेल्या अनेक महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होते. अल्पवयीन […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!