
पुणे शहरात उच्चशिक्षित महिलेसोबत भोंदूबाबाने केला अत्यंत घृणास्पद प्रकार…
पुणे: ईश्वराचा अवतार सांगणाऱ्या राधामोहन मिश्रा या भोंदूबाबाने एका उच्चशिक्षित कॉर्पोरेट महिलेवर केवळ १७ वर्षे अत्याचार करत तिचा अमानुष छळ करत तिला विजेचे शॉक दिले. संतापजनक म्हणजे महिलेला चक्क मूत्र पाजल्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. २००९ ते २०२६ या प्रदीर्घ कालावधीत हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी खराडी पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोन जणांना २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून एकूण ६ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला उच्चशिक्षित असून ती पुण्यातील एका नामांकित खाजगी कंपनीत नोकरी करते. तिचे आई-वडील डॉक्टर आहेत. सुमारे २५ वर्षांपूर्वी तिचे वडील स्वामी केवल नयन यांच्या आश्रमात गेले होते. तिथूनच या कुटुंबाची ओळख हरियाणातील ‘गुरुदेव सांख्य धाम ट्रस्ट’ चालवणाऱ्या राधामोहन मिश्रा नावाच्या भोंदूबाबाशी झाली. भोंदू म्हणजे कोणी दिव्य पुरुष आहे, या भ्रमात राहून डॉक्टर कुटुंब त्याच्या जाळ्यात पूर्णपणे अडकले. २०१० मध्ये या भोंदूने कुटुंबाला पुण्यात स्थलांतरित होण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने पीडित महिलेला तिच्या पतीपासून बळजबरीने विभक्त केले आणि तिची कोट्यवधींची मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली. २०१३ ते २०१६ या काळात छळाची पराकाष्ठा झाली. पीडितेच्या डॉक्टर आई-वडिलांची अंधश्रद्धा एवढी टोकाची होती की, पीडितेने अनेकदा बाबाच्या कृत्यांबद्दल सांगितले, तरी त्यांनी स्वतःच्या मुलीला खोटे ठरवले.
View this post on Instagram
महिलेने तब्बल १७ वर्षे नरकयातना भोगल्या. विरोध केल्यास तिला अमानुष मारहाण केली जायची. भोंदू बाबा आणि त्याच्या साथीदारांनी तिला विजेचे शॉक दिले आणि अघोरी प्रथांच्या नावाखाली तिला मूत्र पिण्यास भाग पाडले. या अमानुष कृत्यामुळे महिला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडली होती. १७ वर्षे हा अमानुष छळ सहन केल्यानंतर शेवटी पीडित महिलेने गुपचूप दुसऱ्या राज्यात असलेले आपले जुने घर गाठले. तिथे तिने आपल्या आई-वडिलांना पूर्णपणे विश्वासात घेतले आणि या भोंदूबाबाचे सर्व काळे कारनामे व गोळा केलेले पुरावे त्यांच्यासमोर मांडले. आपल्या मुलीवर झालेला हा भयानक अन्याय पाहून आई-वडिलांचे डोळे उघडले. अखेर त्यांनी तात्काळ पुणे गाठून खराडी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी मध्यरात्री धडक छापा टाकून मुख्य नराधम भोंदू बाबा राधामोहन मिश्रा (वय ५९, रा. उबाळेनगर) आणि त्याचा साथीदार स्वामी केवल नयन (वय ५८) यांच्यासह गुन्ह्यात मदत करणाऱ्या अन्य सहा महिलांविरोधात लैंगिक अत्याचार, गुन्हेगारी कट रचणे तसेच ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा विरोधी अधिनियमा’नुसार गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
View this post on Instagram
पुणे! भोंदूबाबाचे अश्लील चाळे; चिठ्ठीवर तारीख लिहायचा अन्…
पुणे! भोंदूबाबाचे अश्लील चाळे; चिठ्ठीवर तारीख लिहायचा अन्…
सांगलीत भोंदूबाबाकडून लैंगिक अत्याचार; तू मागच्याजन्मी नागीन अन् हा नाग…
महाराष्ट्र हादरला! शनी अमावस्येच्या पूजेनंतर भोंदूबाबाकडून युवक-युवतीचा खून; श्वान अन् रुमाल…
भोंदू राजेंद्र गडगे याच्याकडे निघाले 200 व्हिडीओ अन् 90 गोळ्या…
महाराष्ट्रातील आणखी एका भोंदूचा महिलेसोबत किळसवाणा प्रकार…

