Video: पुणे ग्रामीण पोलिसांनी स्मशानभुमी मधील लाकडावरुन उघड केला खुनाचा गुन्हा…

पुणे (तेजस फडके) : तावशी (जि. पुणे) या गावातील स्मशानभुमी मधील लाकडावरुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणून वालचंदनगर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तम कामगिरी केली आहे. तावशी (ता. इंदापुर, जि. पुणे गाव) गावाच्या हद्दीमधील स्मशानभुमी मध्ये १६/११/२०२४ रोजी सकाळी ०९/३० वा सुमारास लाकडामध्ये मानवी किंवा अमानवी अवयव जळत असून त्याच्या कडेल जास्त प्रमाणात […]

अधिक वाचा...

घबाड सापडलं! चेकपोस्टवर 190000000 रुपयांची सोनं-चांदी जप्त…

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर-जळगाव रोडवर स्थिर पथकाने गुरुवारी (ता. 15) सायंकाळी सिल्लोड फाट्यावर असलेल्या चेकपोस्टवर 19 कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने ताब्यात घेतले आहेत. संभाजीनगर जळगाव रोडवरील निल्लोड फाट्यावर असलेल्या चेकपोस्टवर संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या वाहनाची तपासणी केली होती. यावेळी 19 कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने सापडले. हे दागिने जळगाव येथील एका ज्वेलर्सचे असल्याची माहिती पुढे आली आहे. […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात फॉर्च्युनर गाडीमधील रोकड जप्त…

पुणे: पुणे जिल्ह्यातील मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये सोमवारी (ता. ११) रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे. देहूरोड परिसरात एका फॉर्च्युनर गाडीत 3 लाख 20 हजार रुपये आढळून आले. विवेक काळोखे आणि सागर बसे हे दोघे पैसे वाटप करायला आलेत, अशी तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांनी गाडीची तपासणी केल्यावर ही रोख रक्कम आढळली. […]

अधिक वाचा...

मुंबईत 1 कोटी 11 लाख रुपयांचे सोन्याचे बॉल जप्त; धक्कादायक माहिती समोर…

मुंबई : मुंबईत एक कोटी ११ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे बॉल जप्त करण्यात आले आहेत. एका इलेक्ट्रिशियनकडे हे सोन्याचे बॉल सापडले असून पोलिस अधिक तपास करत आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून कोट्यवधींची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. अब्दुलकर अब्दुल मजीद (मूळ रा. चेन्नई) या इलेक्ट्रिशियनकडे गुरुवारी (ता. ७) रात्री एक कोटी ११ लाख रुपये किंमतीची […]

अधिक वाचा...

पोलिसांनी जप्त केले मोठे घबाड; रक्कम नेमकी कशासाठी…

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस व भरारी पथकांकडून ठिकठिकाणी कारवाई केली जात आहे. नालासोपारा येथे साडेतीन कोटी रुपये असणारी एटीएम रक्कम घेऊन जाणारी व्हॅन स्थानिक भरारी पथकाने ताब्यात घेतली आहे. सदर व्हॅन नालासोपारा पोलिस ठाण्यात नेण्यात आली असून, या रकमेचा हिशोब मिळत नसल्यामुळे पोलिस अधिक तपास करत आहेत. एटीएम व्हॅनमध्ये साडेतीन कोटी रुपये […]

अधिक वाचा...

इंस्टाग्रामवर रिल्स टाकून घेतला जगाचा निरोप; नेत्याच्या भावावर आरोप…

मुंबई : मालाडमधील एका व्यक्तीने इंस्टाग्रामवर रिल्स टाकून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चंद्रेश तिवारी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी इंस्टावर व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये आत्महत्येस शिवसेना नेते रामदास कदम यांच्या भावाचे नाव घेतले आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. चंद्रेश तिवारी यांनी […]

अधिक वाचा...

पुण्यात 138 कोटी रुपये किमतीचे सोनं आलं कुठून? महत्त्वाची माहिती…

पुणे (संदिप कद्रे): राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांनी दोन कारवायांमध्ये मोठी रक्कम ताब्यात घेतली आहे. पुणे शहरातील सहकार नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत 138 कोटी रुपयांचे सोने पकडले आहे. सातारा रस्त्यावर आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारास नाकाबंदी पोलिसांनी कोट्यवधीचे सोने जप्त केले आहे. याबाबत पुढील […]

अधिक वाचा...

पुणे शहरात आणखी एका कारमध्ये सापडले लाखो रुपये…

पुणे : खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ एका मोटारीत 5 कोटी रुपयांची रोकड सापडल्याची घटना घडली असताना हडपसरमध्ये 22 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. हडपसर रोडवर नाकाबंदीच्या काळात दुपारच्या सुमारास एका कारमध्ये तब्बल 22 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. हडपसर-सोलापूर रोडवर आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर तपासणीदरम्यान एका मोटारीमध्ये मोठी रक्कम सापडली आहे. ही रक्कम […]

अधिक वाचा...

सॉफ्टवेअर इंजिनियरचे पत्नीसोबत धक्कादायक कृत्य अन् अश्लील चित्रीकरण…

पुणे : पिंपरी-चिंचडवडमधील एका सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या युवतीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या नवऱ्याने तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. शिवाय, त्याने तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी पत्‍नीवर लैंगिक अत्‍याचार करण्‍यास सांगून त्‍याचे अश्लिल चित्रीकरण केले आहे. पुनावळे येथे सप्‍टेंबर २०२३ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत ही घटना घडली आहे. पीडित […]

अधिक वाचा...

पोलिस अधिकाऱ्याच्या एकुलत्या एका मुलाची आत्महत्या; मी जीवनाचा आनंद घेतला आहे…

छत्रपती संभाजीनगर : ‘मी जीवनाचा आनंद घेतला आहे, मी माघार घेत नसून मला नवी सुरुवात करायची आहे, लव्ह यू बोथ’ असे खोलीतील आरशावर लिहून ठेवत पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांच्या एकुलत्या एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साहिल शीलवंत नांदेडकर (वय 17) असे मृत मुलाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!