Video: एसटी बसच्या धडकेत शिक्षिका जागीच ठार…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले येथील संजय घोडावत विद्यापीठासमोर रस्ता क्रॉस करत असताना एसटी बसने धडक दिल्याने शिक्षिका जागीच ठार झाली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. एसटी बसने धडक दिल्यानंतर जवळपास 100 फूट एसटी बसने शिक्षिकेला फरफटत नेले. एका बाजुहून दुसऱ्या बाजूला ती रस्ता ओलांडत होती. यावेळी भरधाव आलेल्या एसटी बसची […]
अधिक वाचा...पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी चौथ्यांदा गोळीबार…
पुणे : पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी चौथ्यांदा गोळीबाराची घटना घडली आहे. जंगली महाराज रोड, हडपसर, सिंहगड रोडवर सलग तीन दिवस गोळीबाराच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर येरवडा परिसरात पहाटे दोघांवर गोळीबार झाला. जुन्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. येरवडा परिसरात जुन्या वादाचा राग मनात धरून एकावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. आकाश […]
अधिक वाचा...पुणे पोलिस आयुक्तांनी गुन्हेगारांना दिली तंबी…
पुणे : बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पुण्यात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी गुन्हेगारांची झाडाझडती घेत बंदुकधाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे. पुणे शहरात गोळीबाराच्या घटना घडू नयेत अशी तंबी पोलिस आयुक्तांनी दिली होती. मात्र तरीही गोळीबारची घटना घडली आहे. पुणे शहरात गोळीबाराचा प्रयत्न झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धीरज […]
अधिक वाचा...कौर्याची परिसीमा! भाग्यश्रीचा खून करणारे जेरबंद; पाहा कसा केला खून…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचा 9 लाखांच्या खंडणीनीसाठी अपहरण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महाविद्यालयीन मित्राने त्याच्या साथीदारांसह मिळून तिचा अपहरण करुन हत्या केली. विमानतळ पोलिसांनी खून करणाऱ्या नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. पुणे शहरातील फिनिक्स मॉल समोरुन ३०/०३/२०२४ रोजी भाग्यश्री सुर्यकांत सुडे (वय २२ वर्षे, सध्या रा. […]
अधिक वाचा...पुणे शहरात भीषण अपघातात युवकाचा मृत्यू; धक्कादायक Video…
पुणेः कोंढवे गेट येथे रस्त्याने पायी जाणाऱ्या दोन मुलांना भरधाव वेगात आलेल्या कारने जोरात धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला असून दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. संबधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मनिष नवनाथ तावरे (वय 17) आणि अजिंक्य केदार पाटील (वय 17, दोघेही रा. कोंढवे धावडे) रात्री १०.३० च्या सुमारास रस्त्याने जात होते. अजिंक्य […]
अधिक वाचा...नाशिक-दिंडोरी मार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू…
नाशिक : नाशिकच्या दिंडोरी-म्हसरुळ रस्त्यावर बोलेरो आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की दुचाकीवर असणारे रस्त्याच्या बाजूला उडून पडले होते. अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. नाशिकच्या दिंडोरी म्हसरूळ महामार्गावर आज (शुक्रवार) दुपारी दुचाकी आणि बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पुढे जानोरी फाट्यावर […]
अधिक वाचा...धक्कादायक! चुलत्याने केला अल्पवयीन पुतणीवर अत्याचार, पीडितेने दिला बाळाला जन्म…
बीड : चुलत्याने अत्याचार केल्याने 14 वर्षीय अल्पवयीन पुतणी गर्भवती राहिली आणि तिने बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चुलत्याविरुद्ध पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलगी इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आई-वडिलांसोबत पीडित मुलगी उसतोडणीवरून परत येत असताना तिला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर हा सर्व […]
अधिक वाचा...Video: पोलिसांनी सोन्याची पॉलिश असलेली ‘गोल्डमन’च्या मोटारीवर केली कारवाई अन्…
पुणे : पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालक आणि काळ्या काचा असलेल्या वाहनधारकांविरोधात कारवाई केली. यावेळी 406 वाहनांवर कारवाई करत 4 लाख 37 हजारांचा दंड आकारण्यात आला. पोलिसांनी गोल्डमन म्हणून ओळख असलेल्या शहरातील एका वाहनचालकाच्या वाहनावरही कारवाई करत दंड आकारल्यामुळे परिसरात चर्चा रंगली आहे. वाकड येथील फिनिक्स मॉल परिसर आणि थेरगाव येथील पदमजी पेपर मिल […]
अधिक वाचा...कोल्हापूरमध्ये रोहित शर्मा आऊट झाल्यामुळे वृद्धाचे फोडलं डोक…
कोल्हापूर : मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्याला आनंद झाला होता. या रागातून मुंबई इंडियन्सच्या दोन चाहात्यांनी चेन्नईच्या वृद्ध चाहत्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेत चेन्नईच्या चाहात्याचं डोकं फुटलं आहे. ही घटना करवीर तालुक्यातील हणमंतवाडीमध्ये घडली आहे. मुंबई इंडियन्स विरूद्ध सनराजयजर्स हैदराबाद सामन्यात रोहित शर्मा बाद […]
अधिक वाचा...अमरावतीत भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू…
अमरावती : एका कारचे टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त कार अकोल्याहून अमरावतीला निघाली होती. भातकुली गावाच्या परिसरात कारचे टायर फुटल्यानंतर अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की […]
अधिक वाचा...
