पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात दारुड्याने केला फोन अन् एकच धावपळ…
पुणे : एका दारुड्याने नशेत असताना पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन केला आणि खोटी माहिती दिली. या युवका विरोधात पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित मुकेश चव्हाण असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. त्याचाविरोधात फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रोहित मुकेश चव्हाण हा […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, 5 जण होरपळले…
पुणेः पिंपरी-चिंचवडमध्ये घरगुती गॅसचा स्फोट झाला असून, स्फोटामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. पिंपरीच्या बौद्ध नगरमध्ये आज (बुधवार) सकाळी ही घटना घडली आहे. गॅसचा स्फोटात होरपळलेल्या पाच ही रुग्णांना आधी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यानंतर पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात येत आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण शोधले जाते आहे. गॅस […]
अधिक वाचा...घाटंजी नजीकच्या येळाबारा धबधब्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृत्यू…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी नजीकच्या येळाबारा धबधब्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृत्यू झाला असून, दुसऱ्या युवकाचा शोध सुरू आहे. युवकाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नैसर्गिक सौंदर्याणे परिसरात प्रसिद्ध असलेल्या येळाबारा येथील धबधब्यावर तरुण युवक, युवतींची मोठ्या प्रमाणात दररोज गर्दी राहते. घाटंजी तालुक्यातील दोन युवक धबधबा पाहण्याचा आनंद घेत असताना, क्षणात एकाचा […]
अधिक वाचा...पुणे शहरातील गणेशोत्सवासाठी पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय…
पुणे : पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठा निर्णय घेतला आहे, निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई होणार आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या काळात लेझर बीम लाईट वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी दहिहंडीपासून होणार आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी […]
अधिक वाचा...कोल्हापुरात उच्चशिक्षित बहिण-भावाने घेतला जगाचा निरोप; हृदयद्रावक सुसाईड नोट…
कोल्हापूर : आईच्या निधनानंतर विरह सहन न झाल्याने उच्चशिक्षित सख्या बहिण भावाने राजाराम तलावात उडी घेत जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही भावडांनी आपल्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नये, असे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलिसात झाली आहे. कोल्हापूर शहरातील संभाजीनगर परिसरातील नाळे कॉलनीत राहणाऱ्या भूषण निळकंठ कुलकर्णी आणि भाग्यश्री […]
अधिक वाचा...कमला नेहरू रुग्णालयात दहशतवादी घुसले? दोघांना घेतले ताब्यात…
पुणे: पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या कमला नेहरू रुग्णालयात दहशतवादी असल्याच्या संशयावरुन दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. एक जण फरार होण्यात यशस्वी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुणे पोलिसांनी परिसर ताब्यात घेतला असून, पुढील तपास करत आहेत. मंगळवार पेठेतील कमला नेहरु रुग्णालयाच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा रुग्णालयात तैनात करण्यात आला आहे. रुग्णांना बाहेर हलवण्यात येत आहे. […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! घराची खिडकी उचकटली अन् वडिलांनी फोडला टाहो…
कल्याण: कल्याण पूर्वेतील आयडियल शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विघ्नेश पात्रो (वय 13) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून तो इयत्ता आठवीत शिकत होता. मृत्यूपर्वी त्याने लिहलेल्या चिठ्ठीत शाळेच्या शिक्षिकेवर गंभीर आरोप केले आहेत. कोळसेवाडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात असून पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. विघ्नेश […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये चोरांनी दिले थेट पोलिसांनाच आव्हान…
नाशिक : नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न चंदन चोरांकडून करण्यात आला आहे. शरणपूर रोडवरील पोलीस लाईन व पोलीस उपायुक्तांच्या घरासमोरील एसपींचे निवासस्थान लक्ष करुन चंदनचोरांनी थेट नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिसांना आव्हान दिले आहे. नाशिक जिल्हा पोलीस प्रमुखांच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारात सहा दरोडेखोर घुसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलीस अधीक्षकांच्या […]
अधिक वाचा...महिलांना अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवणारा विकृत ताब्यात…
मुंबई: मुंबईतील 25 महिलांना अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवणाऱ्या विकृताला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. निर्मल नगर पोलीस ठाण्याने ही कारवाई केली असून आयटी अॅक्ट व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद अजीज मोहम्मद निसार खान (वय 36, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो वांद्रे येथील बेहरापाडा परिसरात पराठाचे […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! कुत्रा चिमुकलीच्या अंगावर आदळल्याने मृत्यू तर कुत्रा…
ठाणे: ठाण्यातील मुंब्रामध्ये 3 वर्षांच्या चिमुकलीवर पाचव्या मजल्यावरुन कुत्रा पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मुंब्रामधील अमृत नगरमध्ये चिराग मेसन इमारतीच्या 5व्या मजल्यावरुन एक कुत्रा थेट खाली पडला. यावेळी 3 वर्षांची मुलगी आपल्या आईसोबत रस्त्याने चालत होती. कुत्रा नेमका या […]
अधिक वाचा...
