नाशिकमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी…

नाशिक: नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये विशेष पथकाचे अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचे आदेशान्वये नाशिक शहरात अवैध रित्या अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. पोलिस आयुक्तालय नाशिक शहर अंतर्गत असलेल्या इंदिरा नगर पोलिस ठाणे, हददीतील हॉटेल स्वरांजलीच्या पाठीमागे, दामोदर नगर पाथर्डी शिवार नाशिक येथे मिळालेल्या बातमी प्रमाणे
१) निखील बाळु पगारे, वय २९ वर्षे रा. फ्लॅट नं ७, दादाज अपार्ट, विक्रीभवन समोर, पाथर्डीफाटा शिवार, नाशिक व
२) कुणाल उर्फ घा-या संभाजी घोडेराव, वय – २२ वर्षे, रा एन ५१/एस.एफ.१५/१ भगवती चौक, उत्तमनगर, सिडको, नाशिक यांचे कडून १,००,००० रुपये किंमतीचा २० ग्रॅम वजनाचा एम. डी. (मॅफेड्रॉन) अंमली पदार्थाची विक्री करण्याकरीता बेकायदेशिररित्या कब्जात बाळगतांना मिळून आल्याने त्यांचे विरोधात इंदिरा नगर गुरन ०१२/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ चे कलम ८(क), २०(ब), २९ प्रमाणे दि. १७/०१/२०२४ रोजी २१:२५ वाजता गुन्हा दाखल करण्यात येवून आरोपींना सदर गुन्हयात अटक करण्यात आली होती. त्यानंतर सदर गुन्हयात पाहिजे आरोपी क्र. ०३ अनंत सर्जेराव जायभावे, वय ३० वर्षे, राह. फ्लॅट नं. ७, स्वामी समर्थ नगर, जत्रा हॉटेल मागे, आडगाव, नाशिक यास ताब्यात घेवून त्याचेकडुन २,७०,००० रू.कि.चा ५४ ग्रॅम वजनाचा एम.डी. मॅफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त केला आहे. सदर गुन्हयात आरोपीतांचे आणखी साथीदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर गुन्हयाचा तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उप आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा.पोलिस आयुक्त (गुन्हे) डॉ. सिताराम कोल्हे यांचे सुचना व मार्गदर्शना प्रमाणे वपोनि / पंकज भालेराव, सपोनि / एच. बी. फड, सपोनि / एच के नागरे, सपोउनि / बेंडाळे, पोहवा/१४९७ भामरे, पोहवा/११८५ ताजणे, पोहवा / ४४५ गायकर, पोहवा / १७४९ डंबाळे, पोहवा / २७६ भालेराव, पोना/१३७१ कोल्हे, पोना / १५३३ दिघे, पोना / १६९७ आव्हाड, पोअं/ २४३२ नांद्रे, पोअं/८६९ येवले पोअ / २४२५ सानप, पोअं/ २४३३ बागडे, पोअ / २४०१ वडजे, मपोअं / २३६६ भड, सर्व नेम. विशेष पथक अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाने, कामगिरी केली असून पोलिस आयुक्त, संदिप कर्णिक यांनी टिमचे अभिनंदन केले आहे.

नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन…

नाशिक पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांची मोक्का अंर्तगत कारवाई; पाहा आरोपींची नावे…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हातात बॅट घेतली अन्…

Video: नाशिकमध्ये मद्यपान करणाऱ्यांना ‘विशेष चेतावणी’…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या धडाकेबाज कारवाया सुरू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!