पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात दारुड्याने केला फोन अन् एकच धावपळ…

पुणे : एका दारुड्याने नशेत असताना पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन केला आणि खोटी माहिती दिली. या युवका विरोधात पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित मुकेश चव्हाण असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. त्याचाविरोधात फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रोहित मुकेश चव्हाण हा मंगळवार पेठेतील कमला नेहरु रुग्णालयसमोर थांबला होता. दारूच्या नशेत त्याने पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात (कंट्रोल रुम) संपर्क साधला. मला पोलिस मदत हवी आहे. ३० ते ४० जण तलवार घेऊन मंगळवार पेठेत फिरत आहेत. माझ्या जीवाला धोका आहे, अशी माहिती त्याने मोबाइलवरुन पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पोलिस नियंत्रण कक्षाने त्वरीत फरासखाना पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पण, चौकशीदरम्यान असा कोणताच प्रकार घडला नसल्याचे समोर आले. रोहित चव्हाण याने दारूच्या नशेत पोलिसांना फोन करून चुकीची माहिती दिल्याचे समोर येताच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Video: पुणे शहरातील जखमी पोलिस अधिकाऱ्याचा कर्तव्यबाणा; पाहा आरोपींची अवस्था…

पुणे पोलिसांनी चोरी व गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना केले परत…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाला नवं वळण; आणखी दोघांना अटक…

पुणे शहरातील गणेशोत्सवासाठी पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय…

Video: पुणे शहरात भर पावसात महिला पोलिस अधिकाऱ्याकडून वाहतूक नियंत्रण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!