
घाटंजी नजीकच्या येळाबारा धबधब्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृत्यू…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी नजीकच्या येळाबारा धबधब्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृत्यू झाला असून, दुसऱ्या युवकाचा शोध सुरू आहे. युवकाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नैसर्गिक सौंदर्याणे परिसरात प्रसिद्ध असलेल्या येळाबारा येथील धबधब्यावर तरुण युवक, युवतींची मोठ्या प्रमाणात दररोज गर्दी राहते. घाटंजी तालुक्यातील दोन युवक धबधबा पाहण्याचा आनंद घेत असताना, क्षणात एकाचा पाय ओल्या गोट्यावरून घसरला आणि दोघेही पाण्यात पडल्याने वाहून गेल्याची घटना येळाबारा येथील धबधब्यावर घडली. सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या चमूला पाचारण करण्यात आले. त्यातील देवराज संतोष गेडाम रा. घाटी – घाटंजी यांचा मृतदेह हाती लागला, असून दुसऱ्या युवकाचा शोध सुरु आहे.
देवराज संतोष गेडाम (वय २०, रा. घाटी ता. घाटंजी) व त्याचा सहकारी मित्र सचिन विठ्ठल प्रधान (वय २५, रा. घाटंजी) हे १७ ऑगस्ट रोजी येळाबारा येथील धबधब्यावर गेले होते. धबधबा पाहत असतांना त्यांचा पाय ओल्या गोट्यावरून घसरला व दोघेही पाण्यात वाहून गेल्याची घटनेची माहिती वडगांव पोलीस स्टेशनला देण्यात आली. तेव्हा ठाणेदार संजीव खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार धनंजय शेखदार, अक्षय डोंगरे हे घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पाण्यात वाहून गेलेल्या दोघांचा शोध घेतला. परंतु, रात्री उशिरा पर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. त्यामुळे एनडीआरएफच्या चमूला पाचारण करण्यात आले. शोध घेतल्यानंतर देवराज संतोष गेडाम याचा मृतदेह मिळाला असून सचिन विठ्ठल प्रधान याचा शोध घेतल्या जात आहे.
हृदयद्रावक! एक चिमुकली पाण्यात पडली अन् पुढे तिघींचा मृत्यू…
हृदयद्रावक! जळगावमध्ये तीन मुलांचा धरणात बुडून मृत्यू…
सातारा जिल्हा हादरला! आईने चिमुकलीसह घेतली कृष्णा नदीत उडी…
पुणे जिल्हा हादरला! अनैतिक संबंध, गर्भपाताचा प्रयत्न अन् चिमुकल्यांना जिंवत नदीत फेकलं…
पुणे जिल्ह्यातील कॉलेजमधील पाच विद्यार्थ्यांनी मारली दांडी अन् बेतले जीवावर…

