पिंपरी-चिंचवडच्या पोलिसकाकाने जिंकले दीड कोटी रुपये; पण…

पुणे : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) सोमनाथ झेंडे यांनी ऑनलाईन गेम असलेल्या ड्रीम इलेव्हन वर तब्बल दीड कोटी रुपये जिंकले आहेत. पण, त्यांनी अशा गेम्सपासून सावध राहिले पाहिजे, असे आवाहनही केले आहे. सोमनाथ झेंडे हे गेल्या तीन महिन्यांपासून ड्रीम इलेव्हनवर टीम बनवत आहेत. बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यासाठी झेंडे […]

अधिक वाचा...

जवान पांडुरंग तावरे यांना 12 वर्षीय मुलाने दिला मुखाग्नी…

बीड : सिक्कीममधील ढगफुटीत बेपत्ता झालेले जवान पांडुरंग तावरे हुतात्मा झाले आहेत. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी काकड हिरा (जि. बीड) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पांडुरंग तावरे यांच्या मेघराज नव्याच्या 12 वर्षीय मुलाने त्यांना मुखाग्नी दिला. सिक्कीममधील गंगटोक परिसरात मंगळवारी (ता. 3) ढगफुटी झाल्यानंतर तिस्ता नदीला पूर आला होता. यामध्ये भारतीय सैन्यातील 23 […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाची घराच्या अंगणात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…

सोलापूर: एका सहाय्यक पोलिस निरीक्षकानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आनंद मळाळे असे आत्महत्या केलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे. आनंद मळाळे हे सध्या नांदेड येथे सेवा बजावत होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजलेले नाही. पण, कामाचा ताण […]

अधिक वाचा...

जिद्द! जिद्दीच्या जोरावर कॉन्स्टेबल ते आयपीएस प्रवास…

रांची (झारखंड): रांची पोलिस दलातल्या माजी कॉन्स्टेबल सरोजिनी लाकरा यांनी जिद्दीच्या जोरावर आयपीएस अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आदिवासी कुटुंबातील सरोजिनी लाकरा यांची जीवन कहाणी प्रेरणादायी आहे. आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या सरोजिनीला खेळाची उपजतच आवड होती. शाळेत जाण्यासाठी पाच किलोमीटर अनवाणी प्रवास करावा लागत असे. अ‍ॅथलेटिक्समध्ये कौशल्य मिळवत सातत्याने बक्षिसे जिंकली. […]

अधिक वाचा...

राज्याच्या पोलिस महासंचालक पदी रश्मी शुक्ला…

मुंबई : राज्याच्या पोलिस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली असून, सध्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रश्मी शुक्ला यांची पोलिस महासंचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्याच महिला पोलिस महासंचालक ठरल्या आहेत. सध्याचे पोलिस महासंचालक रजनीश […]

अधिक वाचा...

सिक्किममध्ये ढगफुटी! लष्कराचे 23 जवान बेपत्ता…

गंगटोक (सिक्कीम): सिक्कीममध्ये अचानक झालेल्या ढगफुटीनंतर तीस्ता नदीला पूर आला आहे. यामध्ये भारतीय लष्कराचे 23 जवान बेपत्ता झाले आहेत. प्रशासनाकडून या भागात युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरु आहे. सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे प्रशासानाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे लष्कराचेही नुकसान झाले आहे. गुवाहाटीतील संरक्षण पीआरओंनी […]

अधिक वाचा...

पुणे शहरात एमपीडीए कायद्यान्वये ४५वी स्थानबध्दतेची कारवाई!

पुणे: बिबवेवाडी पोलिस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या अट्टल गुन्हेगारावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एम. पी. डी. ए. कायद्यान्वये ४५ वी स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पुणे पोलिस आयुक्तालयातील बिबबेवाडी पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार सनी संतोष भरगुडे (वय २४ वर्षे, रा. प्लॉट नं. १०, निलेश कॉम्प्लेक्स योगायोग सोसायटी, बिबवेवाडी, पुणे) हा अभिलेखावरील सराईत […]

अधिक वाचा...

सुंदरतेसोबत हुशारी! कोणत्याही क्लासेस शिवाय बनली IPS अधिकारी…

प्रयागराज (उत्तर प्रदेश) : आयपीएस अंशिका वर्मा या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आयपीएस अधिकारी झाल्या आहेत. कोणत्याही शिकवणी शिवाय ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या असून, सोशल मीडियावर त्यांचा फॉलोअर्सची संख्या मोठी आहे. अंशिका वर्मा या मुळच्या प्रयागराजच्या आहेत. गलगोटिया कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बीटेक केल्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली होती. लहानपणापासून नागरी सेवेत […]

अधिक वाचा...

मुंबईमधील अनंत चतुर्दशीला कोणते रस्ते राहणार बंद; पाहा यादी…

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील विसर्जनाच्या दिवशी (ता. 28) महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले असून, विसर्जनानिमित्त मुंबईतील पोलिस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबई पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळता इतर सर्व रजा रद्द करण्यात आल्या आहे. चौपाट्या, तलाव याा ठिकाणी पालिकेने विसर्जनाची चोख तयारी ठेवली आहे. मुंबई शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक गुरुवारी […]

अधिक वाचा...

पुणे शहरात गणपती विसर्जनावेळी वाहतुकीत मोठे बदल; पाहा कोणते रस्ते बंद…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात गुरुवारी (ता. २८) अनंत चथुदर्शीला गणपती विसर्जनावेळी वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे शहरचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आज (मंगळवार) दिली. पुणे शहरात गणपती विसर्जनासाठी 9 हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल, तसेच 3,865 गणेश मंडळांचे विसर्जनाचे नियोजन असणार आहे. मध्यवर्ती भागातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!