![](https://policekaka.com/pk/wp-content/uploads/2023/10/ips-rashmi-shukla.jpg)
राज्याच्या पोलिस महासंचालक पदी रश्मी शुक्ला…
मुंबई : राज्याच्या पोलिस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली असून, सध्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रश्मी शुक्ला यांची पोलिस महासंचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्याच महिला पोलिस महासंचालक ठरल्या आहेत.
सध्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ हे भारतीय पोलिस सेवेतून वयोमानानुसार डिसेंबरमध्ये निवृत्त होणार होते. मात्र व्हीआरएस घेऊन ते एमपीएससी आयोगाच्या संचालकपदी रुजू होणार आहेत. त्यांच्या जागी राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची वर्णी लागली आहे.
ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तत्कालीन मंत्री बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे यांचे फोन टॅप केल्याचे आरोप रश्मी शुक्लांवर करण्यात आले होते. २०१९ मध्ये मविआचं सरकार स्थापन होण्याच्या काळात रश्मी शुक्ला यांनी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांचे फोन टॅप केल्याचा दावा करण्यात आला होता. या नेत्यांचे फोन टॅप करण्याची परवानगी मागताना त्यांची नावे बदलून ही परवानगी घेण्यात आली. यात संजय राऊतांसाठी एस रहाते तर एकनाथ खडसे यांच्यासाठी खडासने असी नावं टाकल्याचाही आरोप करण्यात आला. त्याशिवाय नाना पटोलेंसाठी अमजद खान या ड्रगमाफियाच्या बोगस नावाचा वापर करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात झालेल्या सुनावणीमध्ये रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई व पुण्यात दाखल करण्यात आलेले गुन्हे उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत.
जालना जिल्ह्याचे शैलेश बलकवडे नवे पोलिस अधीक्षक; पदभार स्वीकारला…
रमेश धुमाळ: अथक मेहनतीतून बनले पोलिस उपायुक्त!
कुस्तीने घडविला वर्दीतील डॅशिंग पोलिस अधिकारी
पुणे ग्रामीण पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या…
सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…