डॉक्टर भूलीचे औषध, सलाईन घेऊन गेला बाथरुममध्ये अन् वाजली मोबाईलची रिंग…
मुंबई : सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरने शनिवारी संध्याकाळी वसतीगृहात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवचरण आप्पा पाटील असे आत्महत्या केलेल्या निवासी डॉक्टरचे नाव आहे. या घटनेमुळे सायन रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. शिवचरण पाटील याने ॲनस्थेशियाचा (Anesthesia drugs) ओव्हरडोस घेऊन आयुष्य संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. शनिवारी संध्याकाळी सायन […]
अधिक वाचा...वर्क फ्रॉम होम असलेल्या अविवाहित IT इंजिनियर मुलाने केली आईची हत्या…
अमरावती: एका आयटी इंजिनियर मुलाने स्वतःच्या आईचा गळा आवळून खून केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली असून हत्येनंतर आरोपी मुलगा घरातच थांबला होता. किरकोळ वादातून आई आणि मुलगा तुषार यांच्यात भांडणं झाली होती. रंजना कानफाडे (वय ६०) असे मृत महिलेचं नाव असून तुषार सतीश कानफाडे (वय ३९) असे अटक करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे. तुषार हा […]
अधिक वाचा...तुळजापूरला देवीची ज्योत आणायला गेलेल्या तीन युवकांचा अपघाती मृत्यू…
तुळजापूर: तुळजापूर येथून देवीची ज्योत घेऊन आपल्या गावाकडे परतणाऱ्या युवकांवर काळाने घाला घातला आहे. बीड-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव पांढरी (ता. छत्रपती संभाजीनगर) परिसरात शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास कंटेनरने युवकांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये तीन युवकांचा मृत्यू तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव आणि जाफ्राबादवाडी येथील काही तरुण श्रीक्षेत्र तुळजापूर […]
अधिक वाचा...नाशिकच्या दीपाली पवार मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट…
नाशिक : प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेविका म्हणून काम करणाऱ्या दीपाली पवार यांच्या मृत्यू प्रकरणात पती अनिल सोन्याबापू पवार याच्या पोलिस कोठडीत ११ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान दीपालीच्या मोबाईलचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) काढल्याची बाब समोर आल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. हा सीडीआर कोणाच्या आदेशावरुन काढण्यात आला, असा सवाल […]
अधिक वाचा...कोल्हापूरमध्ये प्रेमाचा भयानक शेवट; तू माझी नाही तर कोणाचीच नाही…
कोल्हापूर: प्रेयसीचा विवाह दुसऱ्याशी ठरल्याच्या संतापातून एकाने अपहरण करून तिला थेट दरीत ढकलून दिल्याची संतापजनक घटना भुदरगड तालुक्यातील शिवडाव नाईकवाडी परिसरात घडली आहे. यामध्ये युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे. तरुणी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी श्रीपाद वडर याला अटक केली आहे. तरन्नूम बशीर नाईक (वय २३, मूळ रा. पाटगाव, […]
अधिक वाचा...प्रदीप पूर्णेकर हत्याकांडप्रकरणी सुभाष शिंदेच्या कोठडीत वाढ; शस्त्रे पुरवल्याचा पोलिसांना संशय…
ठाणे: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सुभाष शिंदे उर्फ पप्या शिंदे याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने आणखी तीन दिवसांची वाढ केली आहे. त्याला १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेली दोन पिस्तुले आणि तीन चॉपर कोणी उपलब्ध करून दिले, तसेच फरार आरोपी संतोष […]
अधिक वाचा...डोबिंवलीत महाविद्यालयाजवळ अंमली पदार्थांची विक्री; विद्यार्थ्याला ओव्हरडोस; रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार…
डोंबिवली: डोंबिवली पूर्वेकडील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्याला अंमली पदार्थांचा ओव्हरडोस झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी ड्रग विक्री करणाऱ्यांविरोधात डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. संबंधित विद्यार्थी अचानक आजारी पडल्याने त्याला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. […]
अधिक वाचा...सातबारा वारस नोंदीसाठी एक लाखाची लाच; कोप्रोलीचे मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…
उरण: सातबारा पत्रकावर वारसाची नोंद करण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना, कोप्रोलीचे मंडळ अधिकारी मौजे चिरनेर येथील तलाठी आणि कार्यालयातील कोतवाल यांच्यावर नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली आहे. त्यात मंडळ अधिकारी आणि कोतवाल रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मौजे चिरनेर येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीच्या सातबारा उतारावर वारस नोंद […]
अधिक वाचा...नवविवाहित युवक आणि युवतीच्या पायाला साखळी अन् कुलुप; नदीत दोघांचे मृतदेह…
धुळे : धुळे जिल्ह्यातील तापी नदीत युवती आणि युवकाचे पाय एकमेकांना साखळीने बांधलेले आणि त्याला कुलूप लावले होते. दोघांनीही एकत्र मृत्यूला कवटाळल्याचा अंदाज आहे. मात्र, त्याआधी युवकाने पत्नीच्या भावाला मध्यरात्री फोन करुन चार शब्दात आपली व्यथा व्यक्त केली होती, अशी माहिती मिळत आहे. श्याम पाटील (वय ३५) आणि त्यांची पत्नी सपना पाटील (वय १९) अशी […]
अधिक वाचा...धक्कादायक! पत्नीचे नको त्या अवस्थेतील फोटो पाहून नवरा हादरला…
छत्रपती संभाजीनगर : एकाने इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट बनवून विवाहितेचे अश्लील फोटो पोस्ट केले असून, त्याने पीडितेचे फोटो तिच्या पतीसह भाऊ आणि इतर नातलगांना पाठवले. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. विवाहितेचे (वय ३०) फोटो वापरून इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीने या बनावट अकाउंटवरून अत्यंत अश्लील […]
अधिक वाचा...
