पुणे शहरात गरोदर असल्याचे सांगून युवकाकडे मागितली खंडणी…
पुणे : एका महिलेने शारीरिक संबंधांची माहिती घरच्यांना सांगते, तर कधी गरोदर असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत युवकाकडे वीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार डिसेंबर २०१९ ते २८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान हडपसरमध्ये घडला आहे. या प्रकरणी लोहगाव येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून ३० वर्षीय महिलेवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात […]
अधिक वाचा...पोलिस झाले हायटेक! आरोपींच्या शरीरावर बसवले जीपीएस; पळाला तरी…
श्रीनगरः आरोपी तुरुंगातून सुटताना त्याच्या पायाच्या घोट्यात जीपीएस यंत्रणा बसण्याचा निर्णय जम्मू-काश्मिर पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे आरोपीच्या सर्व हालचालींवर पोलिसांचे बारीक लक्ष रहाणार आहे. असे तंत्रज्ञान वापरणारे जम्मू-कश्मीर देशातील पहिले राज्य ठरले आहे. आरोपी जामीन किंवा पॅरोलवर असताना फरार होण्याची चिंता राहणार नाही. अतिरेकी कारवायात सामील असलेल्या आरोपींची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी खास […]
अधिक वाचा...हिंजवडी येथील कंपनीमध्ये काम करणाऱ्या युवकाची आत्महत्या…
पुणे : विहिरीत उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना बाणेर येथे कळमकर चौकाजवळील विहिरीत घडली आहे. स्वप्नील राऊत असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या आत्महत्येमागे मानसिक आजार व घरगुती वाद असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. ही घटना ३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली आहे. स्वप्नील हा मूळ बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. […]
अधिक वाचा...पुणे हादरलं! क्षुल्लक कारणावरुन टोळक्याने केली युवकाची हत्या…
पुणे : पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगत अंधारात थांबलेल्या युवकाला ‘तू इथे का थांबलास?’ अशी विचारणा करत चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. यानंतर त्याच्या छातीत चाकू भोकसून हत्या केल्याची धक्कादायक रविवारी (ता. ५) रात्री आठच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा शेळके असे हत्या झालेल्या युवकाचे नाव […]
अधिक वाचा...औरंगजेबाचे स्टोरी स्टेटसवर ठेवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): मंचर (ता. आंबेगाव) येथे इंस्टाग्राम आयडीवर स्टोरी स्टेटस ठेवल्यावरून अरबाज अब्बास मोमीन, साहिल शेख या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. अरबाज अब्बास मोमीन, साहिल शेख या दोघांनी आपल्या मोबाईल वरून त्यांच्या ईस्ट आयडीवर किंग ऑफ हिंदुस्तान अबुल मुजफ्फर मुही -उद -दीन ‘ मोहम्मद औरंगजेब आलमगीर’ […]
अधिक वाचा...येरवडा कारागृहातील बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन…
पुणे (संदीप कद्रे): दिवाळी सणानिमित्त येरवडा कारागृह उद्योग अंतर्गंत बंदयांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून कारागृह निर्मित वस्तुंचे विक्री व प्रदर्शन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरीकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुप्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने या कार्यक्रमादरम्यान केले. अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तिघींची सुटका…
पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड भागात स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलालांवरती कारवाई करून तीन पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पिंपरी-चिंचवड येथे स्पा चे नावाखाली काही दलाल स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अवैद्यरित्या मुलींना स्पा चे नावाखाली जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडतात, अशी गोपनीय माहिती अनैतिक वाहतूक […]
अधिक वाचा...जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा बाळगणाऱ्याला अटक…
पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तलयाच्या हद्दीत जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा बाळगणाऱ्याला गुन्हे शाखा युनिट २ ने कारवाई करत अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. गुन्हे शाखा युनिट २ प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे अधिपत्याखाली ०३/११/२०२३ रोजी पोलिस अंमलदार पेट्रोलिंग करुन रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करीत होते. पोलिस हवालदार १०२३ जमीर […]
अधिक वाचा...आयपीएस वडिलांचा आदर्श! वकिली सोडून ईशा सिंह बनल्या आयपीएस…
हैदराबाद : मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेली वकिली सोडून ईशा सिंह या आयपीएस अधिकारी बनल्या आहेत. त्यांचे वडील महाराष्ट्र केडरचे माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंह यांनी निवृत्तीनंतर वकिली सुरू केली होती. वडिलांप्रमाणेच आयपीएस व्हायचे, असा निर्धार केलेल्या ईशा सिंह यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस ॲकॅडमीमध्ये ७५ आरआर बॅचची पासिंग […]
अधिक वाचा...आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीला तोतया ईडी अधिकाऱ्याचा फोन; म्हणाला…
मुंबई: राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीला बनावट ईडी अधिकाऱ्याचा फोन आला होता. त्याने अनिल भोसले यांना ईडीच्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी 15 कोटी रुपयांची मागणी केली. अनिल भोसले यांना शिवाजीराव भोसले बँक घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली आहे. अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांना एक कॉल आला आणि समोरच्या व्यक्तीने आपण ईडीचा अधिकारी असल्याची […]
अधिक वाचा...
