हृदयद्रावक! घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कॅमेरे लावून छळ; नवविवाहितेची आत्महत्या…
ठाणे : हुंडा आणि सासरच्या छळाला कंटाळून एका नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ मधून समोर आली आहे. विशाखा टिळेकर (वय 26) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी मुख्य आरोपी डॉक्टर पतीसह सासरच्या तिघांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या विकृत पतीने पत्नीच्या प्रत्येक हालचालीवर […]
अधिक वाचा...पुणे शहरात उच्चशिक्षित महिलेसोबत भोंदूबाबाने केला अत्यंत घृणास्पद प्रकार…
पुणे: ईश्वराचा अवतार सांगणाऱ्या राधामोहन मिश्रा या भोंदूबाबाने एका उच्चशिक्षित कॉर्पोरेट महिलेवर केवळ १७ वर्षे अत्याचार करत तिचा अमानुष छळ करत तिला विजेचे शॉक दिले. संतापजनक म्हणजे महिलेला चक्क मूत्र पाजल्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. २००९ ते २०२६ या प्रदीर्घ कालावधीत हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी खराडी पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोन जणांना २० […]
अधिक वाचा...पुणे शहरातील विविध भागांमध्ये झालेल्या फसवणूकीच्या तक्रारींचा आढावा…
पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरातील विविध भागांमध्ये चोरी, ऑनलाइन फसवणूकीच्या घटना घडल्या असून, विविध पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे… View this post on Instagram A post shared by www.policekaka.com (@policekaka_news) १) बाणेर पोलिसांची घरफोडीचा तपास सुरू; ५ लाख १५ हजारांचा ऐवज चोरी बाणेर : बाणेर-पाषाण लिंक रोड येथील […]
अधिक वाचा...कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलिस ठाणे नव्या दिमाखदार वास्तूत; उद्घाटन सोहळा उत्साहात…
पुणे (संदीप कद्रे): कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी परिसरातील नागरिकांची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आमदार योगेश टिळेकर यांच्या विशेष प्रयत्नांतून साकार झालेल्या, नव्याने निर्माण केलेल्या कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलीस ठाण्याच्या सुसज्ज इमारतीचा भव्य उद्घाटन सोहळा मंगळवारी (ता. १६) अत्यंत उत्साहपूर्ण आणि ऐतिहासिक वातावरणात संपन्न झाला. कोंढवा बुद्रुक आणि येवलेवाडी परिसराचा वेगाने होणारा विस्तार आणि वाढती […]
अधिक वाचा...अनैतिक संबंधाचा संशय अन् आमच्या महिलांच्या पाठीमागे लागला आहेस काय म्हणत…
सोलापूर: “तू आमच्या मुलींची छेड काढतोस, आणि आता आमच्या घरातील महिलांच्याही पाठीमागे लागला आहेस,” असा आरोप करत घरासमोरील अंगणात झोपलेल्या एका युवकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या मोहोळ तालुक्यातील एका गावात करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. युवराज अशोक व्यवहारे (वय 27) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी मोहोळ पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत […]
अधिक वाचा...अभिनेत्री संचिता उगले हिचे चॅट समोर, आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण…
मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले हिने 14 जून रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. तसेच, तिच्या आत्महत्येच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांकडून होत आहे. संचिताचा तिच्या मुंबईतील एका सहकलाकाराशी झालेला संवाद समोर आल्यानंतर उज्ज्वल शर्मा याच्याकडून तिचा छळ होत होता, असा आरोप संचिताच्या कुटुंबीयांनी केला आहे. View this […]
अधिक वाचा...महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर…
मुंबईः महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून 733.28 कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेमार्फत 60 टक्के निधी केंद्र तर 40 टक्के निधी राज्य सरकार देणार आहे. सागरी सुरक्षा, ड्रग्जविरोधी मोहिम, सायबर सुरक्षा, आधुनिक शस्त्रे, वाहने सुसज्ज करण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारकडून 733.28 कोटी रुपयांची योजना मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]
अधिक वाचा...नांदेड! आंचल मामीडवार प्रेम प्रकरणात आला मोठा ट्विस्ट…
नांदेड: नांदेडच्या इतवारा परिसरात सहा महिन्यांपूर्वी सक्षम ताटे या युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. सक्षमचे आचल मामीडवार या युवतीसोबत प्रेमसंबंध होते. आंचल मामीडवार हिने आपल्या प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न केले होते. आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केल्यानंतर आयुष्यभर त्याच्या घरी राहण्याची शपथ घेतली होती. मात्र, आंचल मामीडवार प्रेम प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. आयुष्यभर प्रियकर सक्षमच्याच […]
अधिक वाचा...सैराट! नाशिकमध्ये प्रेयसीचा भाऊ अन् मेव्हण्याकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या…
नाशिक: नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील कन्हेरवाडी येथे प्रेमप्रकरणातून एका युवकाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मुलीच्या दोन भावांनी आणि मेव्हण्याने मिळून युवकाचा खून केला आहे. सचिन मोतीराम चौरे (वय २५, रा. नरूळ) असे हत्या झालेल्या प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास करत आहेत. सचिन चौरे याचे आठंबे येथील युवतीसोबत […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात युवतीला ढकललं कालव्यात अन् 18 तासांनंतर…
पुणे : पुणे जिल्ह्यातील मंचरजवळील निघोटवाडी फाटा येथे एका युवतीला डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यात फेकून दिल्याची व त्यानंतर आरोपी युवकाने स्वतः पाण्यात उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीला स्थानिकांनी वाचविले असले तरी युवतीचा मृत्यू झाला आहे. सुमारे 18 तासांच्या शोध मोहिमेनंतर या युवतीचा मृतदेह सापडला आहे. मंचर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रमेश बबन […]
अधिक वाचा...
