हात व मान जवळजवळ धडापासून वेगळे; इस्रायली दंतवैद्याने स्मित मछार यांचा वाचवला जीव…
तेल अवीवः फ्लायदुबई विमान अपघातातील नायक कॅप्टन स्मित मछार गंभीर जखमी झाले आहेत. जगभरातून त्यांच्या शौर्याची प्रशंसा होत आहे. उड्डाणादरम्यान सह-वैमानिकाने त्यांच्यावर एका धारदार शस्त्राने हल्ला केला होता. त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता आणि ते बेशुद्ध पडणार होते. तरीही, त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि विमानात असलेल्या १७४ लोकांचे प्राण वाचवले, असे त्या विमानातील एका […]
अधिक वाचा...पाकिस्तानातून तमिळनाडूत होणारी ३ हजार कोटींची ड्रग तस्करी, भारतीय तटरक्षक दलाने हाणून पाडली; पाच पाकिस्तान्यांना अटक…
नवी दिल्ली: भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसचे अधिकारी आणि जवान, अरबी समुद्राच्या मध्यभागी संशयास्पदरित्या हालचाल करणाऱ्या आझाद नावाच्या एका इराणी जहाजावर पाळत ठेवून होत्या. अनेक दिवसांच्या पाळतीनंतर आणि पाठलागानंतर त्यांनी या जहाजाला अडविले. तपासणीमध्ये बोटीत एकूण ५२६ किलो अंमली पदार्थ सापडले. त्याचे आंतरराष्ट्रीय बाजारातील मूल्य सुमारे ३ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. […]
अधिक वाचा...धीरेंद्र शास्त्री यांच्या धर्मांतराबाबतच्या वक्तव्यावरून पंजाबमध्ये गोंधळ; शाही इमामांचा पोलिसांत जाण्याचा इशारा…
लुधियाना: पंजाबमधील लुधियानामध्ये चालू असलेल्या ‘श्री हनुमान कथे’दरम्यान बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. पंजाबमधील अमली पदार्थांचे व्यसन आणि धर्मांतराच्या विषयावर चर्चा करत असताना, त्यांनीकेलेल्या वक्तव्यावर लुधियानाचे शाही इमाम मौलाना उस्मान रहमानी लुधियानवी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. शाही इमामांनी या विषयावर तातडीची बैठक बोलावली असून, शास्त्री यांनी आपले […]
अधिक वाचा...मुलाला कार्यालयात आणण्यावरून झालेल्या वादानंतर सीआयएसएफच्या जवानाने केला गोळीबार; चार सहकारी मृत्यूमुखी
जम्मू: हिमाचल प्रदेशाच्या सीमेवरील माश्का जलविद्युत प्रकल्पामध्ये आपल्या मुलाला आणण्यावरून, सहकाऱ्यांशी झालेल्या वादाचे पर्यवसान गोळीबार करण्यामध्ये झाला. वादानंतर संतप्त झालेल्या या मुलाचे पिता आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (सीआयएसएफ) हेड कॉन्स्टेबल अवधेश कुमार सिंह या जवानाने आपल्याच चार सहकाऱ्यांवर एके-४७ असॉल्ट रायफलमधून १८ फैरी झाडून त्यांची हत्या केली, अशी माहिती सीआयएसएफच्या एका अधिकाऱ्याने दिली. या […]
अधिक वाचा...दोन कोटी रुपयांचे घर आणि सोने गमावले; दिल्लीतील असा एक सायबर घोटाळा की जो केवळ डिजिटल नव्हता…
नवी दिल्ली: दिल्लीतील एका ७५ वर्षीय महिलेने एका सायबर घोटाळ्यात आपले २ कोटी रुपयांचे घर, दागिने आणि आयुष्यभराची बचत गमावली. हा घोटाळा केवळ डिजिटल स्वरूपाचा नव्हता. तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून आणि ही महिला मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा करून, घोटाळेबाजांनी एक पाऊल पुढे टाकले आणि तिला लुटण्यासाठी थेट तिच्या घरी हजेरी लावली! कर्करोगावर […]
अधिक वाचा...हैदराबादच्या ‘निम्स’ रुग्णालयातील डॉक्टरवर एसीबीचा छापा; कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस…
हैदराबाद: तेलंगणा लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने (एसीबी) हैदराबादमधील निझाम्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (निम्स) अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक आणि अतिरिक्त प्राध्यापक डॉ. नोरी लक्ष्मी भास्कर यांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेची चौकशी तीव्र केली असून, शोधमोहिमेत संशयित बेनामी आणि त्यांच्या साथीदारांशी संबंधित मालमत्ता आणि आर्थिक नोंदी उघडकीस आल्या आहेत. हैदराबाद येथील विशेष पोलीस आस्थापना आणि एसीबी प्रकरणांसाठीच्या प्रधान विशेष […]
अधिक वाचा...३८ वर्षांपूर्वीच्या बँकेवरील दरोडा प्रकरणी केरळच्या ७६ वर्षीय व्यक्तीला १३ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा…
कलपेट्टा (केरळम): वायनाड येथील नल्लूरनाड सर्विस कोऑपरेटिव्ह बँकेत १९८८ मध्ये पडलेल्या दरोड्यात सहभाग असल्याबद्दल दोषी ठरलेल्या, एका ७६ वर्षीय व्यक्तीला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने १३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि १६,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यायाधीश एल. जयवंत यांनी मंगळवारी कोल्लम येथील रहिवासी अब्दुल समद याला या प्रकरणात शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास […]
अधिक वाचा...हवालदारावर हल्ला केल्याप्रकरणी ‘आप’चे सौरभ भारद्वाज, जरनैल सिंग यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल…
नवी दिल्ली: दिल्ली सरकारचे मंत्री परवेश वर्मा यांच्या कानशिलात मारल्याची घटना आता वाऱ्यासारखी पसरते आहे. एका पोलिस हवालदारावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यात सौरभ भारद्वाज, जरनैल सिंग आणि ‘आप’च्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. साहिब सिंग यांच्या विरोधातही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी […]
अधिक वाचा...उज्जैनच्या शाही मशिदीवर बुलडोझर कारवाईपूर्वी जमावाची दगडफेक; पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या…
उज्जैनः मध्य प्रदेशातील उज्जैन येथील शाही मशिदीवरील बुलडोझर कारवाईपूर्वी गोंधळ उडाला. मशिदीजवळ मोठा जमाव जमला आणि पोलिसांशी त्यांची झटापट झाली. आंदोलनादरम्यान पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या अनेक नळकांड्या फोडल्या. उज्जैनमध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम चालू आहे. या प्रकल्पासाठी शाही मशिदीचा काही भाग पाडण्याचे नियोजन आहे. हा भाग पाडण्यासाठी आलेल्या पथकावर समाजकंटकांनी हल्ला […]
अधिक वाचा...गुजरातमध्ये १८७० कोटी रुपयांच्या बनावट राजकीय देणग्या उघडकीस; पोलिसांनी दाखल केला एफआयआर…
अहमदाबाद: गुजरात पोलिसांनी राज्यातील तीन अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांविरुद्ध तीन स्वतंत्र फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यावर अंदाजे १,८७० कोटी रुपयांच्या फसव्या राजकीय देणग्यांच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीचे सुमारे ५६० कोटी रुपयांचे थेट महसुली नुकसान केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात प्राप्तिकर विभागाच्या तक्रारीवरून कारवाई ही कारवाई करण्यात आली आहे. गांधीनगर येथील सीआयडी (गुन्हे) झोनने भारतीय न्याय संहितेच्या फसवणूक, […]
अधिक वाचा...
