अनिकेत पोटे : ‘फिटनेस’बाबत दक्ष अधिकारी!

पुणे (संतोष धायबर): ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.comने तयार केलेल्या पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. खडतर परिस्थितीतून अनेकजण यशस्वी झाले आहेत. मुलाखत घेत असताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे. पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच डॉक्टरांचेही आरोग्याविषयी लेख आहेत. […]

अधिक वाचा...

Video: पुणे शहरात कोयता गॅंगने काढले पुन्हा डोके वर…

पुणेः पुणे शहरात कोयता गॅंगने पुन्हा डोके वर काढले आहे. येरवडा परिसरामध्ये काही युवकांनी कोयता व शस्त्र हातात घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम केले होते. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. येरवडा पोलिसांनी तत्काळ त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. येरवडा परिसरातील गांधीनगर येथे रविवारी (ता. ४) सायंकाळी काही युवकांनी कोयता व शस्त्र हातात घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम […]

अधिक वाचा...

प्रेमसंबंधात अडथळा! पुणे शहरात वेबसिरिज पाहून केला खून अन् मृतदेह…

पुणेः शिरूर तालुक्यात खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पेट्रोल टाकून प्रेत जाळणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व शिकापूर पोलिस पाच दिवसांमध्ये गजाआड केले आहे. वेबसिरिज पाहून खून करण्याची आयडिया आल्याचे आरोपीनी पोलिस तपासात सांगितले. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. दिनांक ०१/०६/ २०२३ रोजी सकाळी ०७.३० वाजणेचे पुर्वी शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील सणसवाडी (ता. शिरूर, […]

अधिक वाचा...

Video: जवानाने प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी…

मुंबई: एका जवानाने प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावली आणि प्रवाशाचा जीव वाचवला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून जवानावर कौतुकांचा वर्षाव करत आहेत. व्हिडिओ मध्ये पाहायला मिळते की, एक रेल्वे प्लॅटफॉर्मवर आली असून, प्लॅटफॉर्म वरून एक आरपीएफ जवान चालताना दिसत आहे. त्याचवेळी एक प्रवासी रेल्वे ट्रॅक ओलांडत होता. […]

अधिक वाचा...

एम. एम. गँगचा म्होरक्याला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

पुणे: पुणे पोलिसांना दोन महिन्यांपासून गुंगारा देणारा एम. एम. गँगचा म्होरक्या व मोक्क्यातील फरार आरोपी मंगेश अनिल माने उर्फ मंग्या (वय २६ वर्षे, रा. सरगम चाळ, अप्पर बिबवेवाडी, पुणे) याला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फिर्यादी रोहित अशोक खंडाळे (वय २४, रा स.नं. ५९, गल्ली नं ०४, शिवछत्रपती शाळे जवळ, कोंढवा बु., पुणे हे साईनगर गल्ली […]

अधिक वाचा...

समृद्धी महामार्गावर २५ होरपळून मृत्यू; चालकाबाबत धक्कादायक माहिती समोर…

बुलढाणाः समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातावेळी बसचालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती फॉरेन्सिक अहवालात उघड झाली आहे. समृद्धी महामार्गावर 1 जुलै रोजी भीषण बस अपघात झाला. बसचालकाचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. या अहवालात बसचालकाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये अल्कोहोल […]

अधिक वाचा...

जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची हत्या…

पुणेः जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे  यांची जमिनीच्या वादातून अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली असून, हत्येनंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी फरार आरोपीचा शोध सुरु केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानसरे यांचा काही लोकांशी जमिनीचा वाद सुरु होता. या कारणावरुन शुक्रवारी (ता. 7) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवार […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील १४ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा यादी…

पुणे: पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील १४ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सोमवारी (ता. १९) रात्री जारी केले. पोलिस निरीक्षकाचे नाव आणि कंसात बदलीचे ठिकाण पुढीलप्रमाणेः – सुनील माने, वरिष्ठ निरीक्षक, विश्रामबाग (वरिष्ठ निरीक्षक, खडक) – अशोक इंदलकर, वरिष्ठ निरीक्षक स्वारगेट (वाहतूक शाखा), – संगीता जाधव, वरिष्ठ निरीक्षक, […]

अधिक वाचा...

पुणे पोलिस आयुक्तांनी केली सात जणांवर निलंबणाची कारवाई…

पुणे: पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सहकार नगर तोडफोड प्रकरणी निलंबनाची कारवाई केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलिस निरीक्षक मनोज शेंडगे आणि पाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. सदाशिव पेठेत युवतीवर झालेल्या हल्ल्यानंतर सदाशिव पेठेतील पेरूगेट पोलिस चौकीच्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता पोलिस आयुक्तांनी पुण्यातील सहकार नगर […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील पोलिसकाकाची आत्महत्या; चिठ्ठीमध्ये लिहीले की…

पुणे : पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या पोलिस शिपायाने घराच्या टेरेसवरील झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वैभव दिलीप शिंदे (वय २९, रा. खेरे कॉलनी, लोहगाव) असे या पोलिस शिपायाचे नाव आहे. वैभव शिंदे यांच्या मागे आई, पत्नी कांचन, भाऊ विजय आणि चार वर्षाचा मुलगा आहे. वैभव शिंदे हे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!