
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन…
परभणी: परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे एका शिक्षकाने आपल्या पत्नी आणि मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिघांनी आत्महत्या का केली? याचं कारण मात्र अद्यापही अपष्ट आहे. या घटनेनं परभणी जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाखेड शहराजवळ असलेल्या धारखेड परिसरामध्ये गोदावरी नदीवर असलेल्या रेल्वे ट्रॅकवर ही घटना घडली. एका शिक्षक कुटुंबाने आत्महत्या केली. मसनाजी तुडमे (वय ४५) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. गंगाखेड शहरातील ममता महाविद्यालयात मसनाजी तुडमे हे शिक्षक कार्यरत होते. त्यांनी पत्नी रंजना (वय ४०) आणि मुलगी अंजली (वय २१) यांच्यासह स्वतःला रेल्वे पटरी खाली झोकून देत जीवन यात्रा संपवली आहे. या घटनेमध्ये शिक्षक मसनाजी तुडमे, पत्नी रंजना तुडमे, मुलगी अंजली यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. शिक्षक असलेल्या मसनाजी तुडमे यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, पत्नी मुलीसह आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
तुटमे कुटुंब हे अहमदपूर तालुक्यातील कीन्ही गावातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेत एकाच कुटुंबातील तिघांनी आपला आयुष्य संपवण्यामुळे खळबळ माजली आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. तिघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, घटना कळताच गंगाखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे आणि गंगाखेड पोलिसांनी घटनास्थळावर दाखल झाले होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पायलट युवतीच्या आत्महत्येबद्दल पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर…
धक्कादायक! आईने घरात घेतला गळफास तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये…
हृदयद्रावक! बापलेकाने एकमेकांना घट्ट मिठी मारून रेल्वेखाली केली आत्महत्या…
पुणे शहरातील पोलिसकाकाने रेल्वेखाली उडी घेऊन घेतला जगाचा निरोप…
सोलापुरात शिकाऊ डॉक्टरची रेल्वेसमोर उडी, शरीराचे झाले दोन तुकडे…

