
पुणे शहरातील फरासखाना पोलिसांनी आरोपींना पाठलाग करून केली अटक; पाहा गुन्ह्याची पद्धत…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील पी.एम.टी. बस मध्ये महिलांची बांगडी कटींग करणारे तसेच गणेश उत्सव दरम्यान गर्दीचा फायदा घेवून भावीकांचे अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या पाच आरोपींना फरासखाना तपास पथकाने पाठलाग करून अटक केली आहे. तपासा दरम्यान १०२.६२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, सोन्याचे दागिने कटींग करण्यासाठी वापरलेले लोखंडी कटर असा सर्व मिळून ७,३४,०६४/- रु किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करुन, एकुण ४ गुन्हे उघड केले आहेत.
पी.एम.टी. बस मध्ये तसेच गणेश उत्सवा दरम्यान गर्दीचा फायदा घेवुन, भावीकांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीचा शोध घेवून, त्यांना अटक करण्याबाबत फरासखाना पोलिस स्टेशन येथील प्रभारी प्रशांत भस्मे यांनी तपास पथकातील अधिकारी वैभव गायकवाड व अरविंद शिंदे यांना व तपास पथकातील पोलिस अमंलदार यांना मार्गदर्शन व महत्वाच्या सुचना दिल्या होत्या. यानंतर अरविंद शिंदे, पोलिस उप-निरीक्षक व तपास पथकातील पोलिस अमंलदार त्यांचे बातमीदारा मार्फत तपास करीत असतांना पोलिस अमंलदार गजानन सोनुने व प्रविण पासलकर यांचे गोपनीय बातमी वरुन, दिनांक ०८/१०/२०२४ रोजी सुर्या हॉस्पीटल समोरील पी.एम.टी. बसस्थानक, कसबा पेठ पुणे येथून तपास पथकातील पोलिस स्टाफचे मदतीने पाठलाग करुन, आरोपी
१) विकी कृष्णा माने, वय १९ वर्षे, रा. सरोदय कॉलनी, प्रकाश जनरल स्टोअर्स मागे मुंढवा पोलिस चौकी समोर मुंढवा पुणे
२) राज कृष्णा माने, बय २३ वर्षे, रा. सरोदय कॉलनी, प्रकाश जनरल स्टोअर्स मागे मुंढवा पोलिस चौकी समोर मुंढवा पुणे
३) कृष्णा रमेश माने, वय ४४ वर्षे, रा. सरोदय कॉलनी, प्रकाश जनरल स्टोअर्स मागे मुंढवा पोलिस चौकी समोर मुंढवा पुणे
४) सुधीर नागनाथ जाधव, वय ४६ वर्षे, रा. साऊथ इंडियन हायस्कुल शास्त्रीनगर घर नं. ७६८, अंबरनाथ वेस्ट जि. ठाणे
५) संतोष शरण्णाप्पा जाधव, वय ४० वर्षे, धंदा बिगारी रा. घुलेनगर लेन नं. २ वरद हॉस्पीटल समोर मांजरी बुगा पुणे यांना अटक केली. पोलिस कस्टडी दरम्यान येरवडा पोलिस स्टेशन कडील एक गुन्हा व फरासखाना पोलिस स्टेशन कडील तीन गुन्हे असे एकुण ४ गुन्हे उघडकीस आणुन १०२.६२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, सोन्याचे दागिने कटींग करण्यासाठी वापरलेले लोखंडी कटर असा सर्व मिळुन ७,३४,०६४/- रु किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात
तपास पथकाला यश आले आहे. दाखल गुन्हयाचा तपास अरविंद शिंदे, पोलिस उप-निरीक्षक हे करीत आहेत.
आरोपी यांची गुन्हा करण्याची पध्दत…
आरोपी गर्दी असलेल्या पी.एम.टी. बस मध्ये बसून, ज्या महिलांचे हातात अगर गळ्यात सोन्याचे दागिने आहे. अशा महिलांना टारगेट करुन, त्यांना इतर चार साथीदार यांचे मदतीने चारही बाजुने नकळत घेरुन, यातील मुख्य आरोपी संतोष जाधव हा त्याचे जवळील लोखंडी कटरने दागिने कट करताच समोरली पी.एम.टी. स्टाफवर उतरुन, चोरलेले दागिने यातील सुधिर जाधव याचे मदतीने अंबरनाथ येथील सराफास, हॉस्पीटलचे कारण सांगुन गहाण ठेवणे आणि मिळालेले पैसे सर्व मिळुन आप-आपसात वाटून घेत असे. पोलिस पकडण्यासाठी आल्यानंतर त्यांचे काही कोड शब्दाचा वापर करुन, पळुन जात असे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी रेकॉर्ड वरील आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलिस उप आयुक्त संदिपसिंह गिल, सहा.पो.आयुक्त फरासखाना विभाग नुतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे, पो.नि.(गुन्हे) अजित जाधव, स.पो.नि. वैभव गायकवाड, पो.उप-नि. अरविंद शिंदे, सपोफौज मेहबुब मोकाशी, पोलिस अमंलदार, गजानन सोनुने, नितीन तेलंगे, महेश राठोड, संदिप कांबळे, प्रविण पासलकर, नितीन जाधव, तानाजी नागरे, वैभव स्वामी, विशाल शिंदे, अर्जुन कुडाळकर, समिर माळवदकर, वसिम शेख, सुमित खुट्टे, महेश पवार, शशिकांत ननावरे, चेतन होळकर यांनी केलेली आहे.
पुणे शहरात खोक्यात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली; कारण समोर…
Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…
बोपदेव घटनेतील आरोपींनी सापडू नये म्हणून कशी केली पोलिसांची दिशाभूल पाहा…
पुणे शहरात पुन्हा हिट ऍण्ड रन, ऑडी कार चालकाने युवकाला चिरडले…
पुणे शहरात चोरी करणाऱ्याच्या विश्रांतवाडी पोलिसांनी लातूरमध्ये जाऊन आवळल्या मुसक्या…
प्रेयसीच्या चिमुकल्याने उलटी केल्याने खून; बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा केला उघड…
बिबवेवाडी पोलिसांनी मोक्यातील टोळी प्रमुख फरार आरोपीस केले जेरबंद…
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

