
ट्रकवर बांधलेली दोरी झाडाच्या फांदीला घासून तुटली अन्…
मुंबई: मुंबईतील वांद्रे परिसरात एका दुर्घटनेत विजय असराणी (वय 40) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या अपघातप्रकरणात ट्रक चालक आलम अन्सारी याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
वांद्रे पश्चिम परिसरात एक ट्र्क कोस्टल रोडच्या कामासाठी लोखंडी साहित्य घेऊन चालला होता. या ट्रकमधील लोखंडी साहित्य दोरीने बांधून ठेवण्यात आले होते. मात्र, ट्र्क टर्नर रोड परिसरात आला तेव्हा झाडाच्या एका खाली आलेल्या फांदीला वाहन घासले गेले. त्यामुळे ट्रकवर बांधलेली दोरी अचानक तुटली. यावेळी विजय असराणी हे शेजारच्या फुटपाथवरुन चालत होते.
ट्रकची दोरी तुटल्यानंतर त्यामधील लोखंडी साहित्य आणि लोखंडाचे भाग सुटे झाले. यापैकी एक लोखंडी भाग रस्त्यावरुन चालत असलेल्या विजय असराणी यांच्या अंगावर पडला. यामध्ये विजय असराणी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आजुबाजूच्या नागरिकांनी विजय असराणी यांना तातडीने भाभा रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्याठिकाणी डॉक्टरांनी विजय असराणी यांना मृत घोषित केले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
कुलदीपचा मृतदेह लटकलेला दिसताच नातेवाईकांना बसला धक्का…
धक्कादायक! नवविवाहीत पत्नी शरीर संबंध ठेऊ देत नाही म्हणून…
Video: पुणे पब ड्रग्ज पार्टी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई…
भीषण अपघात! आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडलं; आमदार म्हणतात…
अभिनेते अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी करणारा गजाआड…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

