
पुणे! बंडगार्डन पोलिस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी…
पुणे : पुणे शहरातील बंडगार्डन पोलिस स्टेशन तपास पथकाने धडाकेबाज कारवाई केली आहे. दरोडयाची तयारी करणा-या सराईत आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांच्याकडून दरोडयाचे साहित्य व चोरीचे मोबाईल फोन असा एकुण ३२,१६०/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपास पथकाच्या या जलद आणि प्रभावी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बंडगार्डन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या आदेशानुसार तपास पथकातील अधिकारी धिरज गुप्ता व अंमलदार गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंगवर असताना पो.अं. कृष्णकांत श्रीराम, ज्ञानेश्वर गायकवाड आणि राजू धुलगुडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जुन्या रेल्वे सिमेंट गोडाऊन परिसरात (मालधक्का चौक, पुणे) काही व्यक्ती दरोड्याची तयारी करत थांबले असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच तपास पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.
त्याठिकाणी तपास पथकाने खालील तिघांना ताब्यात घेतले…
१) जानमोहम्मद नसरुद्दीन शेख, वय ३२, रा. पीर वस्ती, वडकी, पुणे
२) सतीश ज्ञानेश्वर शिरोळे, वय ३५, मुळ रा. दहीटणे, ता. दौंड, जि. पुणे (फिरस्ता)
३) शिव प्रकाश कुमार, वय 23, रा. स्वारगेट कॅनाल, पुणे
पोलिसांनी तिघांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता दरोड्याचे साहित्य आणि ०६ चोरीचे मोबाईल फोन असा मुद्देमाल मिळून आला. सदर मुद्देमाल जप्त करून आरोपींवर बंडगार्डन पो.स्टे. गु.र.नं. ३५२/२०२५ अन्वये भा.दं.वि. कलम ३१०(४), ३१०(५), आर्म्स अॅक्ट कलम ४(२५), आणि मपो अधिनियम कलम ३७(१)(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तिन्ही आरोपींना १८/११/२०२५ रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २१/११/२०२५ पर्यंत पोलिस कस्टडी सुनावली होती. तपासादरम्यान आरोपींकडूनच नोंदविलेला आणखी एक गुन्हा बंडगार्डन पो.स्टे. गु.र.नं. ३५०/२०२५ (भा.दं.वि. कलम ३०९(६), ३(५)) उघडकीस आणण्यात तपास पथकास यश आले. या गुन्ह्यातील मुद्देमाल देखील पुनर्प्राप्त करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन आवळल्या ३६ जणांच्या मुसक्या…
पुणे! टिपू पठाण आणि त्याच्या टोळीवर लावला मोक्का; दणाणले धाबे…
पुणे पोलिसांनी बंडू आंदेकर याच्या तिन्ही पोरांची काढली धिंड…
पुणे स्टेशनवर महिलेसोबत ओळख अन् घरी आणल्यावर बाप-लेकाचं कांड…
पुणे! शिवाजीनगर पोलिसांनी सराईत गुन्हेगारास सापळा रचून केले जेरबंद…

